पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गणेश जयंतीचा मुहूर्त साधून महापौर शकुंतला धराडे यांच्यासह ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. महापौर शकुंतला धराडे यांनी प्रभाग क्रमांक २९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि अपक्ष म्हणून एक उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून महापौर धराडे यांची ओळख आहे. त्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, महापौरांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या पहिले दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. पाचव्या दिवशी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
महापौरांसह ३३ जणांचे अर्ज
By admin | Updated: February 1, 2017 04:41 IST