नारायणगाव : ग्रामपंचायत नारायणगावकडे दि.९ ते १६ नोव्हेंबर या सात दिवसांत करापोटी ३३ लाख १० हजार रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी विजय रोकडे यांनी दिली.शासननिर्णयानुसार करापोटी चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे धोरण स्वीकारल्या. नंतर नारायणगाव ग्रामपंचायतीने दवंडी देऊन करदात्यांना कर भरण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतीच्या आव्हानास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतधारकांनी दि. ९ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या सात दिवसांत ३३ लाख १० हजार रुपये कर भरण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठमोठ्या करदात्यांच्या घरी जाऊन वसुली केली; तसेच करदात्यांचे आभार मानले.ग्रामपंचायतमध्ये करदात्यांचा सत्कार करण्यात आला. करवसुलीचे योग्य नियोजन केल्यामुळे सरपंच संध्या रोकडे, उपसरपंच संतोष पाटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाजगे, आशिष माळवदकर, गणेश पाटे, रामदास अभंग, रमेश पांचाळ, योगेश पाटे, ज्योती दिवटे, अंजली खैरे, सीमा बोऱ्हाडे, माधुरी वालझाड यांनी ग्रामविकास अधिकारी विजय रोकडे व ग्रामपंचायत सर्व वसुली कर्मचारी, तसेच सर्व करदात्यांचे अभिनंदन केले.
नारायणगावला३३ लाखांचा कर जमा
By admin | Updated: November 17, 2016 02:07 IST