शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वेटर खरेदीत पालिकेचे ३२ लाखांचे नुकसान

By admin | Updated: December 12, 2015 00:48 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ५० हजार विद्यार्थ्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने स्वेटर खरेदी करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे महापालिकेचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ५० हजार विद्यार्थ्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने स्वेटर खरेदी करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे महापालिकेचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या ३०० ते ३५० रुपयांच्या स्वेटरची ३९० ते ४५० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षण मंडळाकडून यापूर्वीही वही, कंपासपेटी, फर्निचर यांची चढ्या भावाने खरेदी झाल्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिक्षण मंडळाकडून स्वेटरची चढ्या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या १ ली ते ७ वीमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून स्वेटर देण्यात येत आहे, यासाठी शिक्षण मंडळाने आॅक्टोबर २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली. शिक्षण मंडळाने आॅर्डर दिलेल्या स्वेटरचे दर व प्रत्यक्षात बाजारामध्ये असलेले स्वेटरचे दर याची माहिती सजग नागरिक मंचने गोळा केली. वेगवेगळ््या साइजनुसार ३९० ते ४४४ रुपयांनी स्वेटरची खरेदी करण्यात आली आहे, प्रत्यक्षात बाजारामध्ये तेच स्वेटर २९० ते ३७५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शंभर स्वेटरची खरेदी केली तरी या किमतीला स्वेटर देण्यास ठेकेदार तयार आहेत, मात्र शिक्षण मंडळाने ५० हजार स्वेटरची खरेदी करूनही त्यांना इतक्या चढ्या दराने स्वेटर कसे देण्यात आले, असा प्रश्न सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. या खरेदीमध्ये महापालिकेचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खरेदीसाठी टेंडर काढताना बेसिक रेट जाहीर करणे आवश्यक होते, असे विश्वास सहस्रबुद्धे यांनी सांगितले.स्वेटर खरेदीच्या टेंडर प्रक्रियेमध्ये ९ जणांनी सहभाग घेतला होता, त्यानुसार सर्वात कमी दर देणाऱ्या ठेकेदाराला खरेदीची आॅर्डर देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेनेच नियमानुसार ही प्रक्रिया राबविली आहे. यापेक्षा कमी दरामध्ये कोणी स्वेटर शिक्षण मंडळाला देऊ शकत होते तर त्यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे होते.- वासंती काकडे, अध्यक्ष, शिक्षण मंडळ