शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

बांधकाम विभाग उत्पन्नात ३१८ कोटींनी घट

By admin | Updated: March 30, 2017 03:03 IST

महापालिकेचे आगामी वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक आज (गुरुवार) सादर होणार असतानाच बांधकाम विभागाच्या उत्पन्नात

पुणे : महापालिकेचे आगामी वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक आज (गुरुवार) सादर होणार असतानाच बांधकाम विभागाच्या उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत ३१८ कोटी रुपयांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा परिणाम अंदाजपत्रकाची जुळवाजुळव करताना होणार असून पालिकेला तातडीने उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत. महापालिकेकडून आगामी वर्षात २४ तास पाणीपुरवठा, मेट्रो, एचसीएमटीआर अशा हजारो कोटी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचवेळी उत्पन्नामध्ये घट दिसत असल्याने उत्पन्नवाढीसाठी पालिकेला पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत. पालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये वाढ करण्यासाठी आयुक्तांकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर काटकसरीच्या मार्गांचा अवलंब आगामी काळात पालिकेला करावा लागणार आहे.बांधकाम विभागाच्या चालू वर्षाच्या (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७) उत्पन्नामध्ये ३१८ कोटींनी घट झाल्याचे दिसून आले आहे. बांधकाम विभागाला चालू वर्षी ४७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम परवानगी आणि प्रीमियमच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी बांधकाम विभागाला (२०१५-१६) मधे ७८८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. या तुलनेत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.मिळकत कर विभागाला या वर्षी ११३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी मिळकत कर विभागाला ११०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यांच्या उत्पन्नात आतापर्यंत २५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. राज्य शासनाने एलबीटी (स्थानिक संस्था कर) बंद केल्याने त्याबदल्यात पालिकेला अनुदान दिले जात आहे. एलबीटी हे अनुदान स्वरूपात मिळत असल्याने त्यापासून उत्पन्न वाढीची अपेक्षा करता येत नाही. आगामी वर्षापासून आता एलबीटी ऐवजी जीएसटी कर लागू होणार आहे. आयुक्त आज स्थायीला  सादर करणार अंदाजपत्रकआयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून आज (गुरुवार) दुपारी एक वाजता स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. प्रशासनाकडून दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केले जाते. मात्र यंदा महापालिकेची निवडणूक असल्याने अंदाजपत्रक उशीरा सादर केले जात आहे. स्थायी समितीकडून आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये सुधारणा करून ते मुख्यसभेला सादर केले जाईल. मुख्यसभेच्या मंजुरीनंतर अंदाजपत्रकाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल.विकासकामांना फटकामहापालिकेचे अंदाजपत्रकाचा आकडा ५ हजार कोटी रुपयांचा दिसत असला तरी अधिकारी व सेवक वर्गाचा पगार, भांडवली खर्च, मोठ्या प्रकल्पांचा निधी वजा जाता नगरसेवकांकडून केल्या जाणाऱ्या सह यादीतील विकासकामांना ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होऊ शकत होता. आता बांधकाम विभागाच्या उत्पन्नातच ३१८ कोटींची घट झाल्याने अनेक विकासकामांना त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.महापालिकेला प्रमुख उत्पन्न स्रोतामध्ये एलबीटी, मिळकत कर, बांधकाम विकास शुल्क आदींचा समावेश होतो. महापालिकेच्यावतीने यंदा एकूण ५८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ हजार कोटी रुपयांचा पल्ला पालिकेला गाठता आला आहे. अपेक्षित धरलेल्या उत्पन्नापेक्षा १८०० कोटींची घट दिसून येत आहे. यामध्ये सर्वांत मोठी घट बांधकाम विभागाच्या उत्पन्नात झालेली दिसून येत आहे.