शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन पर्यटनस्थळांना ३१७.३६ लाखांचा निधी

By admin | Updated: January 11, 2017 01:51 IST

जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, शिवनेरी व इंदापूर तालुक्यातील मौजे गंगावळण येथील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत

भीमाशंकर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, शिवनेरी व इंदापूर तालुक्यातील मौजे गंगावळण येथील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ३१७.३६ लक्ष रूपये निधी दिला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७२.३६ लक्ष रुपये मागण्यात आले होते. ही सर्व रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. यामधून राजपूर येथे बांधण्यात येत असलेल्या भक्तनिवास परिसरात विविध सुधारणा करण्याच्या कामासाठी १९२.५९ लक्ष रूपये, भीमाशंकर बसस्थानक आवारात सुधारणा करणे ४७.९९ लक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी एक लक्ष लिटरची टाकी बांधणे या कामास ३१.७८ लक्ष रूपये देण्यात आले आहेत. शिवनेरी किल्ला व परिसर सुशोभीकरण कामामधील किल्ले शिवनेरी येथील गार्डन क्र.५ मध्ये पॅगोडा बांधणे या कामासाठी २५ लक्ष रूपये देण्यात आले आहेत.  इंदापुर तालुक्यातील गंगावळण येथील पर्यटन विकास करण्यासाठी २० लक्ष रूपये देण्यात आले आहेत. राज्याच्या पर्यटन व  सांस्कृतिक कार्य विभागाने दि.४ जानेवारी रोजी काढलेल्या शासन आदेशात जिल्हाधिकारी यांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. (वार्ताहर) श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नुकतीच राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी निधीअभावी भीमाशंकरचे भक्तनिवास सुरू होत नसून १.९२ कोटी रूपये मिळाल्यास पुढील तीन महिन्यात हे भक्तनिवास भाविकांसाठी सुरू करता येईल असे निदर्शनास आणून दिले. तसेच यासह इतर काही कामांना आवश्यक असलेल्या निधी द्यावा अशी मागणी केली होती. ४या पाहणी दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले होते.