शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

७ महिन्यांत ३०६ विद्युत रोहित्रांची चोरी

By admin | Updated: January 11, 2015 23:59 IST

प्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली

प्रज्ञा सिंग-केळकर, पुणेप्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली असून, त्याचा मोठा फटका महावितरणला आर्थिकदृष्ट्या बसला आहेच़ त्याचबरोबरच नवीन रोहित्र बसविण्यास अनेक दिवस वाट पाहावी लागल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे़ महावितरणच्या पुणे परिमंडळात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांचा समावेश होतो़ या तालुक्यांमध्ये गेल्या ७ महिन्यांत ८६ रोहित्र चोरीच्या घटना घडल्या़ सर्वाधिक चोरीचे प्रमाण बारामती विभागात आहे़ या विभागात शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यांचा समावेश आहे़ एप्रिल ते डिसेंबर २०१४अखेर २२० रोहित्र चोरीच्या घटना घडल्या आहेत़ गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरे किंवा वस्त्यांच्या तुलनेत निर्जनस्थळी असलेल्या शेतांमध्ये रोहित्र चोरीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क राहणे, पाळत ठेवणे आणि चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे. रोहित्र चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे तसेच महावितरणचे नुकसान होते व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. रोहित्र सार्वजनिक ठिकाणी व निर्जनस्थळी असल्याने ते सांभाळण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सावध राहून पोलीस यंत्रणा व महावितरणला माहिती दिल्यास रोहित्र चोरी टाळणे शक्य आहे. शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना ज्या रोहित्रावरून वीजपुरवठा होतो, ते रोहित्र सांभाळण्याची जबाबदारी शेतकरी ग्राहकांवरच टाकली आहे़ रोहित्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत़ रोहित्रांना वेल्ंिडग करून ते वीज खांबांना (डबल पोल) जोडण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांना गस्त घालण्यासाठी महावितरणकडून वाहन व कर्मचारी वेळोवेळी मदतीला देण्यात आलेले आहेत. वारंवार रोहित्र चोरीस जात असल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बदलून देण्याबाबतचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. चोरीस गेलेले रोहित्र यापुढे बदलून देण्यात येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे.