शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

By admin | Updated: June 10, 2015 04:53 IST

खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

खोडद : काल (सोमवारी) सायंकाळी ६च्या सुमारास खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मांजरवाडी परिसरात गारपीट व वादळामुळे सुमारे २५० एकर क्षेत्रातील, तर खोडद व हिवरेतर्फे नारायणगाव परिसरात सुमारे ५० एकर क्षेत्रातील टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या बागा, डाळिंबांची झाडे उन्मळून पडली आहेत. जनावरांचा चारा, मका भुईसपाट झाला आहे. काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने विद्युत ताराही तुटल्या आहेत, तर बाभळीसारखे कठीण झाडेसुद्धा उन्मळून पडली आहेत.मांजरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हिवरे परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. डाळिंब व टोमॅटोचे उत्पन्न घेण्याची वेळ तोंडाशी आली असताना वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकरी हताश झाला आहे.हिवरेतर्फे नारायणगाव येथील गहिना भोर यांच्या डाळिंबबागेतील सुमारे ५० डाळिंबाची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत, तर येथील संजय दशरथ भोर या शेतकऱ्याचा ४ एकर क्षेत्राचा टोमॅटोचा प्लॉटदेखील सलग भुईसपाट झाला आहे. मांजरवाडी येथील गायकवाडमळ्यातील सुमारे ७० एकर क्षेत्रातील टोमॅटो, मका, डाळिंब आदी पिकांची हानी झाली आहे. टोमॅटोला गेल्या १० ते १५ वर्षांपासून चांगला बाजारभाव मिळत असल्याने या पिकाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘अर्थ’ प्राप्त करून दिला असल्याने टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल दिवसेंदिवस वाढू लागला आहे. टोमॅटोला उत्पादनापर्यंत शेतकरी एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. सध्या टोमॅटोला २२० रुपये ते ३०० रुपये क्रेटला बाजारभाव मिळत आहे; मात्र सोमवारी झालेल्या गारपीट व वादळाचा प्रचंड मोठा तडाखा टोमॅटोला बसला आहे.दरम्यान, जुन्नरचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी व जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी आज (मंगळावारी) सकाळी मांजरवाडी, खोडद व हिवरेतर्फे नारायणगाव या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मांजरवाडी परिसरातील शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. (वार्ताहर)