शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

पुण्यात दररोज ३५ टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 03:25 IST

इतर शहरांच्या तुलनेत दुप्पट पाणी वापर; तरी पाणीपट्टी थकली

- श्रीकिशन काळेपुणे : पुणे महापाालिका सध्या खडकवासला धरण प्रकल्पातून दररोज १३५ कोटी लिटर पाणी उचलत आहे. प्रतिमाणशी ३३७ लिटर पुणेकरांना पाणी मिळते. हे पाणी इतर शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. असे असतानाही येथे पाणीपट्टीचे ५०० कोटीथकले असून तब्बल ३५ टक्के पाण्याची गळती होत आहे.शहराची लोकसंख्या साधारण ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका जलसंपदा विभागाकडून १३५० एमएलडी पाणी घेते. महापालिका अधिक पाणी वापरते म्हणून दौंड, हवेली, इंदापूर या तालुक्यांना कमी पाणी पडत असल्याचे जलसंपदा सांगते. त्यामुळे या भागात पाण्यासाठी ओरड होते. पुणेकरांनी पाण्याची उधळपट्टी केल्यास उन्हाळ्यात कमतरता जाणवेल, असा इशारा जलसंपदा विभाग वेळोवेळी देत असते. तरी शहरातील पाणी वापर कमी झालेला दिसत नाही. पुणेकरांना दरदिवशी प्रतिमाणसी ३३७ लिटर पाणी मिळत आहे. इतर शहरांच्या तुलनेत हे पाणी दुप्पट आहे. यावर मीटर हाच पर्याय असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.नवीन जलवाहिन्या टाकणारशहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. या जलवाहिन्या लवकरच बदलण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. पाणपट्टीचे थकलेले ५०० कोटी वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.प्रशासनाने पाणी मोफत दिले पाहिजे; पण, जर कोणी पाण्याचा अपव्यव करीत असेल तर मग त्यावर कडक कारवाई करायला हवी. पाणी जपून वापरावे म्हणून ते महाग केले जाणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनीही पाणीबचतीवर लक्ष दिले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.- उपेद्र धोंडे, जलतज्ज्ञ२४ तास पाणी हवे, तर होणार अधिक खर्च2600 कोटी रुपये खर्च शहरात समान पाणीपुरवठा योजना लागू करण्यासाठी होणार आहे.48 किलोमीटरच्या पाइपलाइन आणि ६७ टाक्या बांधण्याची कामे गेल्या वर्षभरात झाली आहेत. ही योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शहरात समान पाणीपुरवठा होईल.अपव्यय टाळण्यासाठी मीटरचा पर्यायपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करणे हा एकमेव पर्याय आहे. जे मोजले जात नाही त्याचे व्यवस्थापन करता येत नाही. एकदा का मीटरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था आणि त्यावर देखरेख करणारी व्यवस्था उभारली की, पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे शक्य होते. त्यातून पाणीबचतीचा प्रचार-प्रसारही करता येतो. पाण्याचा पुरवठा मोजणी करूनच देणे अत्यंत गरजेचे आहे.- अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा प्रमुख, महापालिका