शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला ३ टीएमसी पाणी

By admin | Updated: March 18, 2016 02:57 IST

बारामती-इंदापूर तालुक्यांतील दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दोन्ही तालुक्यांच्या बागायती भागातील पिके करपून जाऊ लागली आहेत.

बारामती : बारामती-इंदापूर तालुक्यांतील दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दोन्ही तालुक्यांच्या बागायती भागातील पिके करपून जाऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर, बारामती तालुक्यातील शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन शिवतारे यांनी बारामती-इंदापूर तालुक्यांना शेतीसाठी ३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेताला आहे. बागायती भागातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. शेतकरीदेखील नीरा डावा कालव्याचे आवर्तन केव्हा मिळणार, याच्या प्रतीक्षेत होते. यामुळे बाळासाहेब गावडे, मारुतराव वणवे, सत्यवान उभे, बाबासाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दिलीप खैरे, राहुल तावरे, राजेंद्र ढवाण, संदीप चोपडे, सुनील शिंदे, यशपाल भोसले, पप्पू मासाळ, माणिक काळे, अ‍ॅड. नितीन भामे, बाळासाहेब शिंदे, अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, कुलभूषण कोकरे यांच्या शिष्टमंडळाने शिवतारे यांची भेट घेऊन माहिती दिली. (वार्ताहर)शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा केली. याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.