शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आंबिल ओढा दुर्घटनेप्रकरणी कुटुंबीयांना ३ लाखांची मदत

By admin | Updated: January 11, 2017 04:01 IST

आंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला. पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे त्या मुलाला हकनाक आपले प्राण गमवावे लागले

पुणे : आंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला. पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे त्या मुलाला हकनाक आपले प्राण गमवावे लागले. यावरून मुख्य सभेमध्ये नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापौर प्रशांत जगताप यांनी त्या मुलाच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिकेच्या मुख्य सभेला सुरुवात होताच नगरसेवकांकडून आंबिल ओढ्यातील दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. स्थानिक नगरसेवक धनंजय जाधव आणि मनीषा घाटे यांनी याचा खुलासा मागितला. महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे १४ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडून चेंबर फोडून तसाच ठेवण्यात आला होता. शेजारी स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू आहे, त्यासाठीच हा चेंबर फोडण्यात आला असल्याचा आरोप घाटे यांनी केला. त्या मुलाच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली. आर्थिक मदत देण्यासाठी पालिकेने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार त्याच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश महापौरांनी दिले. मुख्य सभेपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये त्या मुलाच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. (प्रतिनिधी)दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेतदांडेकर पुलाजवळील आंबिल ओढ्यातील दुर्घटनेमध्ये झालेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी आयुक्तांकडे केली आहे. आंबिल ओढ्यामध्ये पाणी अडवून एस्केव्हेटरने गाळ काढण्याचे काम सुरू होते. परंतु मुलाच्या मृत्यूनंतर मात्र पालिकेने ते काम पालिकेमार्फत सुरू नव्हते असा पवित्रा घेतला आहे. जो अत्यंत घातक, दिशाभूल करणारा आणि अनेक नव्या प्रश्नांना जन्म देणारा आहे, असे कुंभार यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील सर्व नद्या, नाले, ओढे हे देखभालीसाठी फार वर्षांपूर्वी पालिकेकडे वर्ग झाले असून, त्यांच्या देखभालीची जबाबदारी ही पालिकेचीच आहे. त्यामुळे या कामाबद्दल तीन शक्यता निर्माण होतातगाळ काढण्याचे जे काम सुरू होते ते एकतर पालिकेचे होते. काम पालिकेच्या अपरोक्ष चालले होते आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. निविदा दुसऱ्या कामाची आणि प्रत्यक्षात काम मात्र आंबिल ओढ्यात सुरू होते आणि या तिन्ही प्रकरणांत पालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.