शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत गुदमरून ३ मजुरांचा मृत्यू

By admin | Updated: June 19, 2016 03:17 IST

बेल्हा (ता. जुन्नर) येथील पिंगटआळी मधील विहिरीत घाण व गाळ काढण्यासाठी गेलेल्या ३ मजुरांचा एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू झाला.

बेल्हा (जि. पुणे) : बेल्हा (ता. जुन्नर) येथील पिंगटआळी मधील विहिरीत घाण व गाळ काढण्यासाठी गेलेल्या ३ मजुरांचा एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास घडली. रात्री उशीरा अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. विलास सुखदेव पवार (वय २५) सुखदेव बाबूराव पवार (वय ५५) हे पितापुत्र तसेच संदीप राजू पवार (वय २२) अशी मृतांची नावे असून तिघेही बेल्हा इंदिरानगर कॉलनी येथील रहिवासी आहेत. संदीप हा विलासचा चुलतभाऊ आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची ही विहीर आहे. या विहिरीतून घाण व गाळ काढण्यासाठी हे तिघे जण आले होते. विहिरीतून मोठ्या प्रमाणावर उग्र वास येत होता. त्या विहिरीत थोडे पाणीही होते. गाळ काढण्यासाठी सर्वप्रथम संदीप हा विहिरीत उतरला. त्याला उग्र वास येताच भोवळ आली आणि तो त्यात अडकला. त्याला वाचविण्यासाठी विलास हा उतरला. तो ही उग्र वासामुळे गुदमरला. त्याला काढण्यासाठी सुखदेव पवार हे ही विहिरीत उतरले. ते ही उग्र वासामुळे गुदमरले. चौथा मात्र यांची अवस्था पाहूनच विहिरीच्या मध्यातूनच वर आल्याने बचावला. (वार्ताहर)