शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील एकाच कुटुंबातील ३ ठार, तिघे गंभीर, आई, मुलगा व नातवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:18 IST

भरधाव डंपरने मोटारीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले

जेजुरी/ विटा : भरधाव डंपरने मोटारीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले, तर एका लहान मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सांगली जिल्ह्यातील माहुली (ता. खानापूर) येथे बसस्थानकासमोर सोमवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास झाला.सुरेश किसनराव देवकाते (वय ४५), त्यांची आई सुनंदा किसन देवकाते (६७) व मुलगा यश ऊर्फ बबलू सुरेश देवकाते (५, सर्व रा. जेजुरी, जि. पुणे, मूळ गाव जत, जि. सांगली) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. या अपघातात सुरेश यांची पत्नी शोभा सुरेश देवकाते (४५), मुलगी सई सुरेश देवकाते (४) व बहीण स्नेहलता किसन देवक ाते (४०) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.देवकाते कुटुंब हे मूळचे जत येथील, पण नोकरीनिमित्त ते जेजुरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले आहेत. सुरेश देवकाते हे अभियंता होते, ते तळेगाव-दाभाडे (जि. पुणे) येथे नोकरीस होते.नातेवाईकाच्या लग्नासाठी देवकाते कुटुंबीय जेजुरीहून मायणी, विटामार्गे जयसिंगपूरला मोटारीने (एमएच २० एच ११३२) निघाले होते. सुरेश मोटार चालवित होते. गाडीत त्यांच्यासह सहा जण होते. सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता त्यांची मोटार माहुली बसस्थानकासमोर आली असताना, विट्याहून मायणीकडे भरधाव निघालेल्या वाळूच्या डंपरने (एमएच १० एडब्ल्यू ८१९५) त्यांच्या मोटारीला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की मोटारीच्या पुढील आसनावर बसलेले चालक सुरेश, आई सुनंदा व मुलगा बबलू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना हालचाल करण्याची संधीही मिळाली नाही. तसेच पाठीमागील आसनावर बसलेली त्यांची पत्नी शोभा, मुलगी सई व बहीण स्नेहलता हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.>मोटारीचा चक्काचूर...या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. धडक देणारा डंपर वाळू देऊन रिकामा परत चालला होता. अपघात होताच डंपरचालकाने पलायन केले. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपरव मोटार ताब्यात घेतली आहे.>हृदयद्रावक दृश्य...मोटारीच्या पुढील आसनावर सुरेश, त्यांची आई सुनंदा व आजीच्या मांडीवर पाच वर्षांचा बबलू, असे तिघे होते. डंपरने धडक दिल्यानंतर मोटारीत डाव्या बाजूला बसलेला मुलगा व आई यांच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघाताचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांची मने हेलावली.>स्थानिकांची मोठी मदत... : माहुली येथे बसस्थानकासमोरच मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाल्यानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी पोलीस पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी जखमींना बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.>माहुली (ता. खानापूर) येथे सोमवारी वाळूच्या डंपरने मारुती मोटारीला समोरून धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात मोटारीची दुरवस्था झाली.