शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

२८0 दलघफू पाणी अडणार

By admin | Updated: June 16, 2015 00:34 IST

शासनाच्या महत्त्वाकांशी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनी वेग घेतला असून, आतापर्यंत २०० गावांत १३१६ कामे पूर्ण झाली,

पुणे : शासनाच्या महत्त्वाकांशी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनी वेग घेतला असून, आतापर्यंत २०० गावांत १३१६ कामे पूर्ण झाली, तर ७७२ कामे प्रगतिपथावर आहेत. जुलैअखेर ती पूर्ण होतील. या पावसाळ्यानंतर या कामांमुळे साधारण २८० दलघफू पाणी अडवले जाईल, अशी यंत्रणा कार्यान्वित होईल, असे जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील १९८ गावे पहिल्या टप्प्यात घेण्यात आली आहेत. ही गावे पावसाळ्यापूर्वी टंचाईमुक्त करण्याचा अराखडा तयार करण्यात आला असून, सन २०१९पर्यंत सर्व टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेली तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेली व टंचाईग्रस्त गावे यामध्ये निवडण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० गावे घेण्यात आली आहेत. यामध्ये अभियानात साखळी सिमेंट बंधारे, नालाबांध कार्यक्रम, नाला खोलीकरण, जल व कृषी संधारण, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, पाणी अडवणे व जिरवणे यासाठी चरखोदाई अशी कामे करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील २०० गावांमध्ये २ हजार ८८ कामे हाती घेतली होती. त्यांतील १३१६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांसाठी ५१ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. ७७२ कामे प्रगतिपथावर आहेत. ती जुलैैअखेर पूर्ण होतील, असा विश्वास काटकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)