शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.साठी २७ लाख ४९ हजार मतदार

By admin | Updated: January 22, 2017 04:35 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवार (दि.२१) रोजी प्रसिध्द करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ मतदार

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवार (दि.२१) रोजी प्रसिध्द करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ मतदार निवडणुकीसाठी आपला हक्क बजावणार आहेत.जिल्हा परिषदेसाठी ७५ गट तर १३ पंचायत समित्यांमध्ये १५० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यावेळी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गणांची फेररचना करण्यात आली. जिल्ह्यात दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने गट-गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. कायद्यानुसार जिल्ह्यातील एकूण गटांची संख्या ७५ च ठेवण्यात आली असली तरी तालुकास्तारवर गटांच्या संख्येत फेरबदल करण्यात आले. यामध्ये एकट्या हवेली तालुक्यात तीन गटांची भर पडली, तर शिरुर तालुक्यामध्ये नव्याने एक गट वाढविण्यात आला. यामुळे जुन्नर, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येक एक गट कमी झाला आहे. यामुळे मतदार याद्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, गट-गण निहाय मतदार याद्या फोटण्यात आल्या.केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम घेऊन तयार केलेल्या मतदार याद्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकासाठी वापरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाने गट-गणानुसार प्रारुप मदार यादी प्रसिध्द करून हरकती व सूचना मागविल्या. या प्रारुम मतदार यादीवर जिल्ह्यातून शंभर हून अधिक हरकती घेण्यात आल्या होत्या.या हरकतीवर सुनावणी घेऊन अखेर शनिवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या कमी झाली असून, २७ लाख ४९ हजार १६९ मतदारांची यादी प्रसिध्द करण्यात आल्या. (प्रतिनिधी) जिल्ह्यात १४ लाख १६ हजार ७११ पुरुष तर १३ लाख २ हजार ४४६ महिला मतदार आहेत. तर यावेळी प्रथमच १२ मतदारांची इतर मतदार म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात २ लाख ६३ हजार, आंबेगाव- १ लाख ७२ हजार, शिरुर-२ लाख ३७ हजार, खेड-२ लाख ६३ हजार, मावळ-१ लाख ७६ हजार, मुळशी-१ लाख २१ हजार, हवेली- ४ लाख ५१ हजार, दौंड- २ लाख ३२ हजार, पुरंदर १ लाख ५६ हजार, वेल्हा- ४६ हजार ४५४, भोर- १ लाख ३२ हजार, बारामती- २ लाख ४७ हजार, आणि इंदापूर तालुक्यात २ लाख ६६ हजार मतदार आहेत.