शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या १६२ जागांसाठी २६६१ अर्ज

By admin | Updated: February 4, 2017 04:19 IST

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील १४ निवडणूक कार्यालयातून एका दिवसात विक्रमी २२१५ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील १४ निवडणूक कार्यालयातून एका दिवसात विक्रमी २२१५ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत जमा झालेल्या एकूण अर्जांची संख्या २६६१वर पोहोचली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून यादी जाहीर न करता अर्ज शुक्रवारी सकाळी थेट उमेदवारांना बोलावून ए व बी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धांदल उडाली. सर्वच निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळलेली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी अकरापासून होती, मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर उमेदवारांनी रांग लावली होती. अर्ज भरण्याची मुदत ३ वाजता संपली, त्यावेळी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची रांग कायम होती. घोले रोड, भवानी पेठ, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)चिन्ह व केंद्रनिहाय मतदार यादी ८ फेब्रुवारीलाअपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना ८ फेब्रुवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. तसेच या दिवशी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे मतदारांना कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावयाचे आहे, याची स्पष्टता येणार आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.आज छाननी, तर मंगळवारी अर्ज माघारीमहापालिका निवडणुकीसाठी आठवडाभर सुरू असलेली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. आज ४ फेब्रुवारी रोजी (शनिवारी) अर्जांची छाननी होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी (मंगळवारी) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.शेवटच्या दिवशीच प्रतिसादशुक्रवारी औंध निवडणूक कार्यालयात ९६, घोले रोड १८२, सहकारनगरमध्ये २२०, कोथरूड १११, बिबवेवाडीमध्ये १२०, हडपसरमध्ये १४४, नगररोड १९२, भवानी पेठ २२६, वारजे कर्वेनगर १५७, येरवडा २३१, भवानी पेठ १८९, टिळक रोड १३९, कोंढवा ११८ अर्ज जमा झाले आहेत. शेवटच्या दिवशी सर्वाधिक २२० अर्ज सहकारनगर येथे, तर सर्वांत कमी अर्ज ९६ अर्ज औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाले. औंध निवडणूक कार्यालयामध्ये गुरुवारी खूप अर्ज दाखल झाले असल्याने शुक्रवारी अर्ज कमी आले. महापालिका निवडणुकांसाठी दि.२७ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिले ६ दिवस अर्ज भरण्यास काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्यानंतर मात्र इच्छुक उमेदवारांची धावपळ उडालेली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली नसतानाही काही विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षांच्या नावाने अर्ज भरले होते. त्यांनी ए व बी फॉर्म शुक्रवारी जमा केले. उर्वरित बहुसंख्य उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरले.3उमेदवारांनी एका प्रभागात एक पेक्षा अधिक अर्ज दाखल केले असले, तरी त्या उमेदवाराला त्या प्रभागातून एकाच जागेवर निवडणूक लढविता येणार आहे, त्यापेक्षा जास्त अर्ज भरले असतील, तर माघार घ्यावी लागणार आहे.