शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : शहरातील टेकड्या आणि तेथील वनवैभव टिकविण्यासाठी नागरी संयुक्त वन व्यवस्थापन योजनेंतर्गत शहरातील भांबुर्डे आणि वारजे वनक्षेत्राचे संरक्षण ...

पुणे : शहरातील टेकड्या आणि तेथील वनवैभव टिकविण्यासाठी नागरी संयुक्त वन व्यवस्थापन योजनेंतर्गत शहरातील भांबुर्डे आणि वारजे वनक्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका, वनविभाग आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ५ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे एकूण २६ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध केली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

रासने म्हणाले, वृक्षसंवर्धन समितीने १५ जूनच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली होती. पुणे शहर परिसरात सुमारे १ हजार ८२६ एकरचे वनक्षेत्र आहे. पहिल्या टप्प्यात पाचगाव-पर्वतीतील ६१३ एकर, भांबुर्डा वन विभागातील २५० एकर आणि वारज्यातील १२५ एकर अशा एकूण ९८८ एकर क्षेत्रांवर वनसंवर्धनाचे काम सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात पाचगाव-पर्वती, भांबुर्डा, वारजे या विभागांसह कोथरूड, धानोरी वनक्षेत्रात योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली होती. वनक्षेत्राला सुरक्षा भिंत बांधणे, वृक्षारोपण, रोपवाटिका, नालाबंडिंग, सुरक्षारक्षक नेमणे अशा प्रकारची कामे करण्यात आल्याचे ते म्हणाले

===

केंद्र सरकारने १९८८ साली ग्रामीण भागात सुरू केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन योजनेच्या धर्तीवर पुणे शहरात २००६ मध्ये वनखाते, पुणे महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापनाला सुरुवात झाली. त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठण करण्यात आले होते.

===

योजनेवर झालेल्या खर्चाचा तपशील

वर्ष तरतूद खर्च

२००६ ते २०११ १० कोटी २३ लाख ९ कोटी ६१ लाख

२०१४ ते २०१९ ४ कोटी ८० लाख २ कोटी ३१ लाख