शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी २५ जूनचा मुहूर्त

By admin | Updated: April 17, 2016 03:02 IST

स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेकडून २५ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट लिमिटेड

पुणे : स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेकडून २५ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट लिमिटेड या कंपनीच्या सोमवारी (दि. १८) होणाऱ्या पहिल्यावहिल्या बैठकीत घेण्यात येणार आहे. २५ जून २०१६ अथवा त्यापूर्वीच या योजनेत सहभागी झालेल्या शहरांनी स्मार्ट सिटीचे काम सुरू करावे, असे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीसमोर तब्बल ३१ विषयांची कार्यक्रमपत्रिका ठेवण्यात आली असून त्यात प्रामुख्याने कंपनीचे आर्थिक वर्ष निश्चित करणे, अध्यक्षांना अधिकार देणे, कंपनीच्या प्राथमिक खर्चांना मान्यता देणे, कंपनीसाठी कर्मचारी नेमणे, तातडीच्या प्रकल्पांना मान्यता देणे अशा विषयांचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेकडून कंपनी स्थापनेसह सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कंपनीच्या १५ सदस्य असलेल्या संचालक मंडळाची पहिली बैठक सोमवारी होणार आहे. त्यासाठीची कार्यक्रमपत्रिका प्रशासनाकडून सर्व सदस्यांना पाठविण्यात आली आहे.तीन ते चार प्रकल्प होणार सुरूस्मार्ट सिटी योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून २०१५ रोजी केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ पर्यंत शहरांची निवड, योजनेसाठीचा निधी, तसेच योजनेबाबतचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. मागील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने २५ जून २०१६ पूर्वी निवड झालेल्या शहरांनी काम सुरू करावे, अशा सूचना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केल्या होत्या. त्यानुसार, संचालक मंडळाकडून सोमवारी होणाऱ्या बैठकीत काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार, या तारखेपूर्वी ३ ते ४ प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविणे तसेच इतर कामांसाठी आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाचे स्वरूप लक्षात घेऊन २५ जूनपूर्वी काम सुरू करण्याचाही प्रयत्न राहणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात बाणेर-बालेवाडी स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकावला असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात बाणेर-बालेवाडी परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच १९४ कोटींचा खर्च केंद्र शासनाने राज्य शासनाकडे वितरीतही केला आहे, तर या प्रकल्पासाठी कंपनीच्या अध्यक्षपदी महापालिका आयुक्तांची नियुक्ती केली आहे. केंद्र शासनाकडून २५ जूनपूर्वी काम सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र, त्यापूर्वीच काम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याअनुषंगाने पहिल्या बैठकीत काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असून कोणते प्रकल्प सुरू करता येतील, यावर चर्चा केली जाणार आहे.- कुणाल कुमार (महापालिका आयुक्त)