शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

२५ लाखांचा धनादेश होणार बाऊन्स?

By admin | Updated: March 22, 2016 01:50 IST

पिंपरीच्या साहित्य संमेलनाचे आयोजक पी. डी. पाटील यांनी नम्रपणे परत केलेल्या शासनाच्या २५ लाख रुपयांच्या निधीबाबत साहित्य महामंडळाच्या बडोदा येथे झालेल्या बैठकीमध्ये कोणताच

पुणे : पिंपरीच्या साहित्य संमेलनाचे आयोजक पी. डी. पाटील यांनी नम्रपणे परत केलेल्या शासनाच्या २५ लाख रुपयांच्या निधीबाबत साहित्य महामंडळाच्या बडोदा येथे झालेल्या बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यामुळे निधीचा चेंडू विदर्भ साहित्य संघाच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. परंतु, १ एप्रिलनंतर महामंडळ विदर्भाकडे हस्तांतरित होणार असल्यामुळे नवीन पदाधिकारी नेमून पहिली कार्यकारिणीची बैठक होईपर्यंत हा चेक बाऊन्स तर होणार नाही ना? अशी भीती पदाधिकाऱ्यांकडूनच व्यक्त केली जात आहे.पी. डी. पाटील यांनी पिंपरीचे साहित्य संमेलन स्वबळावर यशस्वी केल्याने त्यांनी शासनाकडून मिळालेले २५ लाख रुपये साहित्य महामंडळाकडे सुपूर्त केले. हा निधी शासनाला परत द्यावा किंवा संमेलन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी निर्मित करण्यात आलेल्या महाकोशात ही रक्कम टाकावी, असा मतप्रवाह समोर आला. मात्र, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी या निधीचा वापर महामंडळाने साहित्यिक उपक्रमांसाठी करावा, असे सूचित केल्याने हा प्रश्न निकाली निघाला.महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा कल हा निधी महाकोशात टाकण्याकडेच अधिक होता. परंतु पी. डी. पाटील यांनी धनादेश हा कोशनिधीच्या नावे न देता महामंडळाच्या नावाने दिला असल्यामुळे हा धनादेश महाकोशनिधीमध्ये जमा करण्यास अडचणी आहेत. हा मुद्दा नुकत्याच झालेल्या महाकोशाच्या बैठकीत उपस्थित झाला. त्यामुळे पी. डी. पाटील यांनी नव्याने हा धनादेश महाकोशाच्या नावाने काढला, तरच हा निधी महाकोशात जाऊ शकतो. मात्र, पी. डी. पाटील यांनी महामंडळाने हे पैसे दिले होते, त्यामुळे महामंडळाच्या नावानेच धनादेश दिला आहे, असे सांगितल्याने पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली. या कारणास्तव या निधीच्या वापराबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण असल्याने हा धनादेश अजून कोणत्याच खात्यात जमा करण्यात आलेला नाही. हा धनादेश पाटील यांनी जानेवारीत संमेलन झाल्यानंतर चार-पाच दिवसांतच महामंडळाला परत केला. त्यालाही दीड महिना उलटून गेला आहे. तीन महिन्यांनंतर कोणताही धनादेश बाऊन्स होतो. सध्याच्या महामंडळाचा कालावधी हा ३१ मार्चपर्यंतचा आहे. त्यानंतर महामंडळ हे विदर्भ साहित्य संघाकडे जाणार आहे. एप्रिल महिन्यात महामंडळ विदर्भाकडे गेल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडून येणे आणि महामंडळाची पहिल्या कार्यकारिणीची बैठक होणे याला मे महिना उजाडण्याची शक्यता आहे. या कालावधीत २५ लाख रुपयांचा धनादेश बाऊन्स होण्याची शक्याता आहे. या नवीन चिंतेने पदाधिकाऱ्यांना घेरले आहे. यातच विदर्भ आणि नागपूरमध्ये काहीसे वाद आहेत. त्यामुळे या निधीच्या निर्णयावर एकमत होणे तसे अवघडच असल्याचेही सांगण्यात आले.