शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे पुणे शहरात आगीच्या २५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:02 IST

दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे आगी लागण्याच्या घटना यंदाही घडल्या असून तीन दिवसांत शहरात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने त्या किरकोळ स्वरुपाच्या होत्या.

पुणे : दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे आगी लागण्याच्या घटना यंदाही घडल्या असून तीन दिवसांत शहरात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने त्या किरकोळ स्वरुपाच्या होत्या.लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते़ गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या चार तासांत आगीच्या १५ घटना घडल्या होत्या़ त्यात काही झाडांना, कचराकुंड्यांना आगी लागल्या होत्या़ शहराच्या बाणेर, बिबवेवाडी, कात्रज, खराडी, पाषाण, कोथरूड, हडपसर यांसह अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या़ पाडव्याच्या दिवशी शहरात एकूण ७ आगीच्या घटना घडल्या़ बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास एका कापड गोदामाला आग लागली होती़ पासोड्या विठोबा चौकात रहेजा हँडलूम हे कापडाचे दुकान तळमजल्यावर असून त्याचे गोदाम तिसºया मजल्यावर आहे़ दिवाळीनिमित्त गोदामामध्ये कापडाचा स्टॉक ठेवण्यात आला होता़ या आगीमध्ये सर्व माल जळून खाक झाला़ अग्निशमन दलाच्या पाच वाहनांच्या मदतीने २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले़ या आगीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर कोंडला होता़शनिवारी शहरात रात्रीपर्यंत गुरुवार पेठ, येरवडा येथे आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या़ फटाक्याने कचरा पेटीतील कचरा पेटल्याने आग लागली होती़अग्निशमन दलाने आपल्या सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द करून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवली होती़ आगीसंबंधी कॉल येताच गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळविण्यात येत होते़