शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार वृद्ध कलावंतांचे मानधन खात्यांत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:47 IST

‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव’ पुरस्काराची रक्कम आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे, तसेच आतापर्यंत राज्यातील २४ हजार १७७ पात्र वृद्ध कलावंतांचे मानधन बँक खात्यात जमा केल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे.

पुणे : ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव’ पुरस्काराची रक्कम आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे, तसेच आतापर्यंत राज्यातील २४ हजार १७७ पात्र वृद्ध कलावंतांचे मानधन बँक खात्यात जमा केल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित असल्याचा आरोप ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टा’ कार्यक्रमांतर्गत केला होता.विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार समिती तमाशातील ज्येष्ठ कलाकाराची या पुरस्कारासाठी निवड करते. आतापर्यंत प्रभाताई शिवणेकर, भीमाभाऊ सांगवीकर, गंगारामबुवा कवठेकर, राधाबाई खोडे नाशिककर, मधुकर नेराळ आदी मान्यवरांना ‘जीवनगौैरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारप्राप्त कलाकाराच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांची एकत्रित रक्कम जमा होते, असे सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.