शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंटलाईन वर्कर्ससाठी २४ तास लसीकरण सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:11 IST

पुणे : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण अद्याप सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे अधिकारी कर्मचारी ...

पुणे : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण अद्याप सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे अधिकारी कर्मचारी झटत आहेत. त्यामुळे अनेकांचे लसीकरण राहिलेले आहे. या फ्रंटलाईन वर्कर्स तसेच वैद्यकीय सेवांसह इतर अत्यावश्‍यक सेवांची जबाबदारी असलेल्यांसाठी आता पालिकेकडून पाच केंद्रांवर २४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

शहरात रात्री ११ नंतर मर्यादीत संचारबंदी लागू केली असली तरी अत्यावश्‍यक सेवा आणि फ्रंटलाइन वर्कर यांना वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रावर रात्री जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे अगरवाल यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांना ड्युटीपेक्षा पाच ते सहा तास अधिक काळ काम करावे लागत आहे. कोरोनाने उग्र रुप धारण केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आरोग्य सेवकांच्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. तर, फँटलाईन वर्कर्सच्या लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात केली आहे. लसीकरण केंद्रांची मर्यादीत संख्या आणि दैनंदिन काम यामुळे पालिका, पोलीस तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण कमी झाले आहे. सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेल्या केंद्रांवर या कर्मचाऱ्यांसह, शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लस मिळत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता रात्रीही लस देण्याची व्यवस्था केली आहे.