पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात २३८८ अर्ज दाखल केले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची वेळ होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुपारी तीननंतर प्रवेश बंद करण्यात आला. निवडणुकीसाठी शहरातील ५५०४ जणांनी उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरले होते. शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर करणाऱ्यांची गर्दी होती, तर कार्यालयाबाहेर त्यांच्याबरोबर आलेल्या समर्थकांची गर्दी होती. तीनपूर्वी कार्यालयात आलेल्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घेतली होती. उमेदवारीअर्जासोबतच जोडपत्र अ आणि ब देणे बंधनकारक असल्याने एबी फार्म पोहोचविण्यासाठी तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)- राजकीय पक्षांनी जोडपत्र अ आणि ब हे उमेदवारी अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्याने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी अ फॉर्म आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सुपूर्त केला होता. तर जोडपत्र ब हा थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे अनिवार्य होते. त्यामुळे उमेदवारीसाठी जोडपत्र ब देण्याचा गोंधळ सायंकाळपर्यंत सुरू होता. - गुरुवारपर्यंत ६०३ अर्ज दाखल झाले होती. आज दुपारी तीनपर्यंत १७८५ असे २३८८ उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत. कार्यालयअर्ज 1) चिखली2522) इंद्रायणीनगर1593) अंकुशराव लांडगे सभागृह 2334) नेहरूनगर1485) प्राधिकरण2486) हेडगेवार भवन2127) चिंचवड लिंक रोड3038) करसंकलन थेरगाव2269) ड प्रभाग रहाटणी17610) आयटीआय कासारवाडी21911) पीडब्ल्यू डी मैदान212एकूण प्रभाग 32 2388
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २३८८ अर्ज दाखल
By admin | Updated: February 4, 2017 04:12 IST