पुणे : देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय प्रवासासाठीच्या विमानांचे तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने लोहगाव विमानतळावरूप प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या या वर्षी तब्बल ३१ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत लोहगाव विमानतळावरून तब्बल २१ लाख ७५ हजार प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. विशेष म्हणजे ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मागील वर्षी याच कालावधीत सुमारे १६ लाख ५७ हजार प्रवाशांनी प्रवास केलेला होता. तर या वर्षा अखेरीस ही संख्या ५० लाखांचा आकडा ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तिकिटांचे आवाक्यात आलेले दर आणि देशांतरगत प्रवासाठी बस तसेच रेल्वेच्या तिकिट दराच्या तुलनेत काही टक्केच अधिक असलेल्या तिकिट दरांमुळेही प्रवासी संख्या वाढत आहे. लोहगाव विमानतळावरून दररोज देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अशा एकूण १३० फेऱ्या प्रतीदिन होतात. जानेवारी ते डिसेंबर २०१३ मध्ये सुमारे ३५ लाख ९६ हजार विमानप्रवासी होते. हा आकडा जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ४१ लाख ९० हजार होता. हा आकडा २०१५ मध्ये आॅगस्टअखेर २१ लाख ७५ हजारांवर पोहचला आहे. मागील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये आॅगस्ट अखेर ही प्रवासी संख्या १६ लाख ५७ हजार होती. विमाळतळ पडतेय अपुरेवाढलेल्या प्रवासी संख्येच्या तुलनेत विमानतळ अपुरे पडत आहे. लोहगाव विमानतळ हे लष्कराच्या हददीत असल्याने त्यासाठी असलेली जागा ही मर्यादीत आहे. त्यामुळे वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत आवश्यक त्या सुविधा देण्यात प्रशासनास अडचणी येते आहेमहापालिकेकडून देण्यात येणारे पाणी पुरेशा प्रमाणात नसल्याने संपूर्ण वर्षभर टँकरचा आधार घ्यावा लागतो. .
आठ महिन्यांत २२ लाख प्रवाशांनी केला प्रवास
By admin | Updated: October 28, 2015 01:17 IST