अशोक पवार म्हणाले की, घोडगंगा कारखान्याने चालू गळीत हंगामात जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्या अनुषंगाने कारखाना प्रशासनाकडून चांगले नियोजन करण्यात आले आहे. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर करखान्याने आजअखेर चार लाख ९३ हजार १९० मे.टन उसाचे गाळप केले असून कारखान्याचा सरासरी साखर उतारा आजअखेर.११.१५ टक्के इतका आहे.
दरम्यान, सरासरी साखर उताऱ्यांत घोडगंगा कारखाना जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात प्रथम क्रमांकावर आहे. आज अखेर कारखान्याने पाच लाख ४५ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याची चालू गळीत हंगामासाठीची निव्वळ एफआरपी दोन हजार ४५६ रुपये २९ पैसे इतकी असून गाळप करण्यात आलेल्या उसासाठी कारखान्याने देान हजार १०० रुपये प्रती मे. टनाप्रमाणे ॲडव्हान्स रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केली आहे. आपल्या संस्थेचे, सभासदाचे व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून सभासदांनी व ऊस उत्पादक आपला ऊस घोडगंगालाच घालवा असे आवाहनही पवार यांनी केले.