शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत २० हजार तक्रारी

By admin | Updated: January 16, 2016 02:42 IST

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘१८२’ क्रमांकाच्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या क्रमांकावर दिवसाला विविध प्रकारच्या

पिंपरी : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘१८२’ क्रमांकाच्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या क्रमांकावर दिवसाला विविध प्रकारच्या ७० ते ८० तक्रारी येत आहेत. मागील नऊ महिन्यांत सुमारे २० हजार तक्रारी क्रमांकावर आल्या आहेत. पूर्वी रेल्वेकडून तक्रारींसाठी आठ आकडी दूरध्वनी क्रमांक व मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर आलेला कॉल प्रवासी ज्या स्थानकाजवळ असेल, तेथील जवळपासच्या रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस फोर्सच्या (आरपीएफ) ठाण्याकडे वर्ग केला जायचा. तेथून मग प्रवाशांना मदत दिली जात असे. यामुळे मदत मिळण्यासाठी विलंब होत असे. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे प्रातिनिधिक स्वरूपात १३ आॅक्टोबर २०१४ ला ‘१३२२’ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मध्य रेल्वेने देशात एकच हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचे ठरविले. या अनुषंगाने एप्रिल २०१५ ला ‘१८२’ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी, महिलांच्या आरक्षित डब्यामध्ये पुरुषांचा प्रवेश टाळणे या मुख्य उद्देशासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मात्र, नागरिकांपर्यंत याचा हेतू पोहोचू न शकल्याने तिकिटासंदर्भात विचारपूस, रेल्वेच्या वेळेबाबत चौकशीचे कॉलही येतात. मागील महिन्यापासून प्रत्येक रेल्वे स्थानकावर या हेल्पलाइन क्रमांकाबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू केले. पत्रके वाटण्यात आली. स्टिकर लावण्यात आले. तिकीट हरवले असल्यास, जनरल डब्याचे तिकीट असताना आरक्षित जागेवर बसल्यास, मद्यपींकडून प्रवाशांना त्रास होत असल्यास, अपंगांच्या व महिलांच्या डब्यात प्रवेश केल्यास या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार येतात. सर्वच कंपन्यांची मोबाइल सेवा असेल, तरीही या क्रमांकावर फोन करता येईल. एप्रिल ते डिसेंबर २०१५ दरम्यान १८२ हेल्पलाइन क्रमांकावर पुणे विभागात २० हजार कॉल आले आहेत. यामध्ये बारामती, दौंड, सोलापूर, लोणावळा या मार्गांचाही समावेश आहे. दिवसाला येणाऱ्या ७० ते ८० कॉलपैकी १५ टक्के कॉल तक्रारींचे असतात. यामध्ये केवळ दोन टक्के कॉल महिलांच्या तक्रारीचे आहेत. एखादी आजारी व्यक्ती रेल्वेतून प्रवास करीत असेल. त्यांचा मोबाइल बंद असेल, तर त्यांच्या नातेवाइकांकडून आलेले कॉलसुद्धा प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे काम हेल्पलाइनच्या माध्यमातून केले जाते. (प्रतिनिधी)या हेल्पलाइन क्रमांकाला चांगला प्रतिसाद आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा क्रमांक पोहोचावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनजागृती सुरू आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर पत्रके वाटली जात आहेत. स्थानकावर आणि रेल्वेच्या डब्यांमध्ये स्टिकर्स लावण्यात आले आहेत. लोकांपर्यंत रेल्वेच्या जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवनवीन उपाययोजना केल्या जातात.- डी. विकास, विभागीय सुरक्षा उपायुक्त, रेल्वे सुरक्षा दल