शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २० लाख मतदार पत्त्याविना; ११ लाख मृत

By नितीन चौधरी | Updated: September 29, 2023 07:05 IST

मतदार पडताळणीत पुणे जिल्हा तळात; वाशीम, गडचिरोलीत शंभर टक्के

नितीन चौधरी

पुणे : मतदारांनी दिलेला पत्ता योग्य आहे का, ते त्याच पत्त्यावर राहत आहेत का, त्या पत्त्यावरील मृत मतदारांची नावे कायम आहेत का, तसेच नवमतदारांचा समावेश करायचा आहे का, या कारणांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑगस्टपासून मतदार पडताळणी मोहीम देशभर सुरू केली आहे. राज्यातही ही मोहीम सुरू असून वाशिम, गडचिरोली आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये १०० टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेत पुण्याचा क्रमांक तळात लागला असून जिल्ह्यात सर्वांत कमी अर्थात ८२ टक्के मतदारांची पडताळणी झाली आहे. या पडताळणीत ११ लाख १० हजारांहून मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

ही पडताळणी करत असताना राज्यात १९ लाख ८८ हजार ३६० मतदार त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. तर ११ लाख १० हजार ८८१ मृत मतदार आढळले आहेत. तर ७ लाख ४० हजार १ मतदार संबंधित विधानसभा मतदारसंघातून अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे सुमारे १८ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याच मोहिमेत ४ लाख २८ हजार ९६० मतदारांची छायाचित्रे बदलण्यात आली आहेत. राज्यात ६२ हजार ७६५ मतदार हे एकापेक्षा अनेक मतदारसंघांमध्ये असल्याचे आढळून आले आहेत.

पावणेनऊ कोटी मतदारांची पडताळणी पूर्ण मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात ९ कोटी ८ लाख ३२ हजार ११५ मतदार असून आतापर्यंत ८ कोटी ६४ लाख ३४ हजार ७०५ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी ९५.१६ इतकी आहे. वाशिम, गडचिरोली व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सर्व मतदारांची अर्थात शंभर टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी पडताळणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ८० लाख ७३ हजार ११३ मतदारांपैकी ६६ लाख ५७ हजार ४३४ मतदारांची पडताळणी होऊ शकली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी ८२.५० इतकी आहे.

पुढील दहा दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रारूप मतदार यादी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ती २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत नवमतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे.- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक