शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीमुळे २ टीएमसी बचत

By admin | Updated: January 4, 2016 01:13 IST

शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे.

पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यापासून पुणेकरांची सुटका होण्यास मदत होणार आहे. यंदा सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. यापार्श्वभुमीवर पुणे शहराच्या पाण्यात ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपलब्ध असलेले पाणी शहराला जुलै २०१६ अखेर पर्यंत पुरविण्याबरोबरच इतर दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे. यापार्श्वभुमीवर गेल्या ४ महिन्यात वाचलेले २ टिएमसी पाणी उन्हाळयात खूप उपयोगी पडणार आहे. पाणीकपात लागू करण्यापूर्वी शहराला दररोज १२५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यामध्ये कपात करण्यात आल्यापासून दररोज ८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यानुसार ४ महिन्यात २ टिएमसी पाणी वाचविण्यात यश आले आहे. पाणी कपातीबरोबरच जलवाहिन्यांमधील पाणी गळती रोखणे, त्याचा अपव्यय टाळणे. बांधकाम, जलतरण तलाव आणि अन्य व्यवासयिक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी आदी उपाययोजना महापालिकेकडून राबविण्यात आल्या. त्यामुळेही पाणी बचत होण्यास मदत झाली आहे. ही बचत अशीच सुरू राहिल्या जुलै २०१६ अखेर पर्यंत अजून ४ टिएमसी पाण्याची बचत होऊ शकणार आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी एक हेल्पलाइन महापालिकेत सुरू करण्यात आली आहे. पाणी गळती होत असल्याचा फोन या हेल्पलाइनवर आल्यास लगेच त्याची दुरूस्ती केली जात आहे.