शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत मिलिटरी कॅन्टीनला २ लाख ८० हजारांचा गंडा

By admin | Updated: July 9, 2017 22:22 IST

नोटबंदीच्या काळात एजंटद्वारे घेतलेल्या स्वाइप मशिनद्वारे केलेल्या व्यवहारात अपहार करून चक्क मिलिटरी कॅन्टीनची दोन लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 9 : नोटबंदीच्या काळात एजंटद्वारे घेतलेल्या स्वाइप मशिनद्वारे केलेल्या व्यवहारात अपहार करून चक्क मिलिटरी कॅन्टीनची दोन  लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. साई कॅश या कंपनीचे प्रतिनिधी आनंद जगदीश वैष्णव (रा. मोरेश्वर सोसायटी, ठाणे),अनिल चंद्रकांत फुलेलु (रा. जुनी सांगवी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मिलिटरी कॅन्टीनचे शिपाई नीलेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. नोटबंदीमुळे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही स्वाईप मशिन साई कॅश कंपनीकडून अनिल फुलेलू यांच्यामार्फत घेतली होती. हे यंत्र खरेदी केल्यापासून स्वाईप मशिनद्वारे जेवढे आर्थिक व्यवहार व्हायचे, तेवढे पैसे अगोदर कंपनीच्या प्रतिनिधीच्या खात्यात जमा व्हायचे. कंपनीचा प्रतिनिधी आनंद वैष्णव याच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर तो मिलिटरी कॅन्टीनच्या बँक खात्यात ती रक्कम वर्ग करायचा. पहिले दोन महिने व्यवहार सुरळीत सुरू होते. जानेवारी २०१७ पासून मिलिटरी बँक खात्यावर रक्कम जमा होणे बंद झाले. विचारणा केल्यास तांत्रिक कारण देऊन वेळ मारून नेली जायची. अशा प्रकारे तब्बल २ लाख ८० हजार ३० रुपये जानेवारीनंतर मिलिटरी कॅन्टिनच्या खात्यावर जमा झालेच नाहीत. काही तरी गडबड आहे, ही बाब लक्षात आली. कंपनीच्या संबंधित प्रतिनिधींकडे विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.