पुणे : शहरात विविध कारणांस्तव राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून लक्ष्य करण्यात आलेल्या पीएमपीला गेल्या ४ वर्षांत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पीएमपी प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या माहितीनुसार, शहरात ५ जुलै २०१० रोजी केंद्रातील विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. यामध्ये १११ बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५६,३७,४५५ रुपयांचे नुकसान झाले, तर दिनांक २८ डिसेंबर २०१० रोजी पुणे जिल्हा बंद आंदोलनात ६० बसवर दगडफेक झाल्याने तब्बल ३१,५१,३१२ रुपयांचे नुकसान झाले. कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नोव्हेंबर २०११मध्ये शहरात १८ बसवर हल्ला करण्यात आला.त्यात २ लाख २० हजारांचे नुकसान झाले.याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाईदरम्यान झालेल्या हिंसाचारात दगडफेकीत ८३,000 आणि ३१ मे रोजी पेट्राल दरवाढ झाल्याने ३३ बसवर दगडफेक करण्यात आली, त्यात ४ लाख ६५ हजारांचे नुकसान झाले. तसेच ३१ मे २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना झाल्याने १ लाख १४ हजारांची आणि १ आॅक्टोबरला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याने, १७ नोव्हेंबर २०१२ रोजी विविध पक्षांतर्फे बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये १० बसच्या काचा फोडण्यात आल्याने १ लाख ६२ हजारांचे नुकसान झाले. तर फेब्रुवारी २०१४मध्ये मनसेने पुकारलेल्या टोल बंद आंदोलनादरम्यानही झालेल्या दगडफेकीत १,७५,५०० आणि २६ फेब्रुवारी २०१४ रोजी रोजी मुंबईत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ स्वारगेट परिसरात ४ बसचे ९३ हजारांचे नुकसान झाले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.मागील आठवड्यात फेसबुकवर महापुरुषांच्या करण्यात आलेल्या बदनामीच्या घटनेनंतर शहरात ४३ बस फोडण्यात आल्या असून, १६ लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
दगडफेकीत पीएमपीचे २ कोटींचे नुकसान
By admin | Updated: June 12, 2014 05:07 IST