शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिघा भावांची १९ वर्षांनी मुक्तता

By admin | Updated: December 13, 2015 02:53 IST

किरकोळ कारणावरून झालेला वाद... या वादातून एकावर धारदार शस्त्राने झालेले वार... आणि त्यानंतर याप्रकरणी तब्बल १९ वर्षे तीन सख्ख्या भावांवर चाललेला खटला... मात्र, शनिवारी झालेल्या

पुणे : किरकोळ कारणावरून झालेला वाद... या वादातून एकावर धारदार शस्त्राने झालेले वार... आणि त्यानंतर याप्रकरणी तब्बल १९ वर्षे तीन सख्ख्या भावांवर चाललेला खटला... मात्र, शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये समुपदेशन आणि तडजोडीच्या माध्यमातून हा खटला निकाली काढण्यात आला. त्यामुळे तीनही भावांची खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली.शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या महा लोकअदालत मध्ये अनेक खटले दोन्ही बाजूंच्या पक्षकारांच्या तडजोडीतून निकाली काढण्यात आले. त्यामध्ये या गंभीर गुन्ह्यातील खटल्याचाही समावेश आहे. ही घटना दि. ८ आॅक्टोबर १९९६ रोजी मांजरी जवळील शेवाळवाडी फाटा येथे घडली होती. या प्रकरणी राजेंद्र रामभाऊ टकले (वय ४६, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी टकले घटनेच्या दिवशी शेवाळवाडी फाटा येथे आले होते. त्यावेळी राजू हरिभाऊ झेंडे (वय ५०), संजय हरिभाऊ झेंडे (वय ४७) आणि रमेश हरिभाऊ झेंडे (वय ५४, रा. शेवाळवाडी) हे तिघे सख्ख्ये भाऊ तिथे आले. झेंडे बंधू व टकले यांच्यात घटनेच्या दोन दिवस आधी वाद झाला होता. घटनेच्या दिवशी दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ का केली, अशी विचारणा टकले यांनी तिघांना केली. यावरून चौघांमध्ये पुन्हा वादावादी झाली. या रागातून तिघांनी टकले यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात टकले जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तिघांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणात सरकारी वकीलांनी ४ साक्षीदारही तपासले होते. मागील १९ वर्षांपासून हा खटला सुरू होता. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये हा खटला मांडण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. म्हालटकर, अ‍ॅड. पूजा ढलपे आणि अ‍ॅड. मेघना कालकर यांनी केलेल्या समुदपदेशामुळे दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाली. फिर्यादींनी ही तक्रार मागे घेतल्यानंतर न्यायालयाने तिन्ही भावांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.