शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकार टँकरचे वर्षभरात १९ बळी

By admin | Updated: January 21, 2016 01:28 IST

वाघोलीजवळच्या बकोरी गावच्या हद्दीमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जीव गमवावा लागला.

पुणे : वाघोलीजवळच्या बकोरी गावच्या हद्दीमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जीव गमवावा लागला. चटका लावून जाणाऱ्या अशा एक ना अनेक घटना दररोजपुण्यामध्ये घडत असून, टँकरचालकांच्या बेदरकारपणामुळे गेल्या वर्षभरात तब्बल १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालकांच्या या बेजबाबदारपणाला आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शहरालगतच्या उपनगरांचा परीघ विस्तारत चालला आहे. तेथील लोकवस्ती वाढत चालल्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील टँकरचालकांचे चांगलेच फावले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधून अनेकदा पाणी सांडत असते. त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. रस्त्यांवर वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या केलेल्या टँकर्समुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण अपघातांपैकी टँकरमुळे १८ प्राणांतिक अपघात झाले असून, त्यामध्ये १९ नागरिकांचा जीव गेला आहे. चालकांचे वाहतुकीविषयीचे अपुरे ज्ञान, वेळेत पोचण्याची झालेली घाई, वेगावर नसलेले नियंत्रण ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. या वाहनांना रिफ्लेक्टर्सही नसतात.टँकर्समुळे झालेल्या अपघातांचे गांभीर्य ना महापालिकेला आहे; ना ठेकेदारांना. अपघातग्रस्त टँकर्स आणि चालकांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. ठेकेदार आणि टँकरचालकांची मुजोरी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठत चालली आहे. (प्रतिनिधी)वाघोली : टँकरची दुचाकीला धडक बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बकोरी गावच्या हद्दीतील वारघडेवस्ती येथे वाघोली-बकोरी रोडवर बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. अपघातानंतर चालक फरार झाला असून, चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने तणावपूर्ण वातावरण झाले होते.अभिषेक राजेंद्र वारघडे (वय १४, रा. बकोरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा कंपनीमध्ये आईला सोडून दुचाकीवरून पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता. मगरवस्ती चौक सोडून पुढे वारघडेवस्ती येथून जात असताना टँकरने दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक फरार झाला़ अपघाताचे वृत्त समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली़ चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइक आणि ग्रामस्थांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची खबर समजताच लोणी कंद पोलिसांनी परिस्थिती हाताळत मृतदेह हलविला. अधिक तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.