शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घोड धरणात १८ ते २० टक्केगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 01:15 IST

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणामध्ये आजअखेर १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिर्सच इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेतर्फे

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणामध्ये आजअखेर १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिर्सच इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १८ ते २० टक्के गाळ साचला असल्याचा अहवाल संस्थेने दिला होता, अशी माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाची पाणी साठवण क्षमता ५.४७ टीएमसी आहे. त्यापैकी २ हजार १७२ द. ल. घ. फू. हा मृत, तर ३ हजार ४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिर्सच इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेने या धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्यांच्या अहवालात जवळपास १८ ते २० टक्के गाळ धरणात साचला असल्याचा अंदाज त्यांनी दिला होता. यामुळे धरणाच्या पाणीक्षमतेवर परिणाम झाला आहे. अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेच पाणी वर अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० टक्के भरले आहे.या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे. याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव-कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो.