शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात १६ टक्केच ‘हेल्मेटदक्ष’; महिलांचे प्रमाण केवळ ८ टक्के

By admin | Updated: May 11, 2017 05:00 IST

कोणतीही सक्ती ही खरे तर वाईटच! पण, एखादा वाहतुकीचा नियम हा दीर्घायुष्यासाठी हितावह ठरणारा असेल तर तो पाळला जाणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोणतीही सक्ती ही खरे तर वाईटच! पण, एखादा वाहतुकीचा नियम हा दीर्घायुष्यासाठी हितावह ठरणारा असेल तर तो पाळला जाणे आवश्यक आहे, यावर कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, नियम कसा जाचक आहे, हेच जर पालुपद घोकत राहिले, तर चांगल्या गोष्टींची अंमलबाजवणी केवळ नागरिकांमधील जागरूकतेच्या अभावामुळे कशी लागू होऊ शकत नाही, याचे एकमेव उदाहरण म्हणजे ‘हेल्मेटचा होणारा वापर!’ एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीमधून पुण्यात हेल्मेट परिधान करण्याबाबत दक्ष असण्याचे प्रमाण हे अवघे १६ टक्केच असल्याचे समोर आले असून, पुरुषांच्या तुलनेत हेल्मेट वापरण्याचे प्रमाण महिलांमध्ये केवळ ८ टक्केच असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात कोणतीही गोष्ट यशस्वी झाली, की ती सर्वत्र प्रचलित होते असे म्हणतात; मात्र वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीच्या दिशेने उचलले पाऊल पुणेकरांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे पुढे पडू शकलेले नाही, हे या आकडेवारीमधूनच काहीअंशी खरे ठरले आहे. इंडियन मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट १९८८ नुसार दुचाकीचालक आणि मागे बसणारी व्यक्ती या दोघांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. लोकसभेत नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कायद्यातही वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे शहरातील विविध चौकांमध्ये ७६९ वाहनचालकांची एक प्राथमिक पाहणी करण्यात आली आणि ५८ छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांच्या निरीक्षणातून केवळ १६ टक्केच पुणेकरच हेल्मेट परिधान करण्याबाबत जागरूक असल्याचे दिसून आले आहे. पुरुष आणि महिला दोघांमध्येही हेल्मेट वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. विशेषत: पुरुषांचे प्रमाण हे १८ टक्के असून, त्यातुलनेत महिलांचे प्रमाण हे २ टक्के इतकेच असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी पुणेकरांकडून हेल्मेट वापरण्याला प्राधान्य दिले जाते; मात्र घरापासून दोन ते तीन किलोमीटरवर जाण्यासाठी हेल्मेटला बगल दिली जात असल्याचे आढळले आहे. याशिवाय ११० पुणेकरांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यात हेल्मेटचे वजन, ते आकर्षक नसणे, अत्यंत वाईट डिझाईन, धिम्या गतीने गाडी चालविणाऱ्यांना हेल्मेटची काय गरज? अशी असंख्य कारणे हेल्मेट न वापरण्यासाठी देण्यात आली.यामध्ये ५९ टक्के पुणेकर हेल्मेट सक्तीच्या विरोधात होते, ३२ टक्के लोकांनी हेल्मेटच्या डिझाईनमध्ये बदल करण्याची मागणी केली, तर इतरांनी वाहनचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.