पुणे: राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यांत जुन्या काळातील १६ एमएम मधील ७१ चित्रपटांची नव्याने भर पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. या ७१ चित्रपटांपैकी सुमारे पन्नास चित्रपट असे आहेत की, जे कोणत्याही स्वरूपात आतापर्यंत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे '१६ एमएम' चे हे दुर्मिळ चित्रपट म्हणजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने एक अनमोल ठेवा ठरला आहे. या ७१ चित्रपटांपैकी सुमारे ६६ चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल आहेत. या चित्रपटांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 'वारणेचा वाघ' या गाजलेल्या कादंबरीवर आधारित असलेला 'वारणेचा वाघ'(१९७०), प्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर यांची कथा-पटकथा आणि संवाद असलेला आणि राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला 'संत गोरा कुंभार' (१९६७) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांचा 'केला इशारा जाता जाता' (१९६५) आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे तर रंगीत चित्रपटांमध्ये भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील या दिग्गज दिग्दर्शकांबरोबरच व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा'(१९७२), आणि 'चंदनाची चोळी, अंग अंग जाळी' (१९७५), 'आयत्या बिळावर नागोबा' (१९७९), 'सुळावरची पोळी' (१९८०), दादा कोंडके यांची महत्वाची भूमिका असलेला 'गनिमी कावा' (१९८१), 'नवरी मिळे नवऱ्याला ' (१९८४), 'गुलछडी' (१९८४), 'चंबू गबाळे' (१९८९), 'दे धडक बेधडक' (१९९०) आणि 'प्रतिकार' (१९९१) आदी चित्रपटांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात '१६ एमएम ' ७१ चित्रपटांची नव्याने भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 12:13 IST
'१६ एम एम' चित्रपटांचा इतिहास जतन व्हावा तसेच तो भावी पिढ्यांना ज्ञात व्हावा या उदात्त हेतूने देशपांडे यांनी हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात '१६ एमएम ' ७१ चित्रपटांची नव्याने भर
ठळक मुद्देया ७१ चित्रपटांपैकी सुमारे ६६ चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल त्याकाळात १६ एम एम प्रिंट्समुळे खेडोपाडी चित्रपट पोहचविण्याचे फार मोठे कार्य साध्य