शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

१५६० मुलांना प्रवेशच नाही!

By admin | Updated: October 12, 2015 01:27 IST

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेने करूनही घोडेगाव प्रकल्पांतर्गत सुमारे १५६० आदिवासी मुलांना प्रवेशच मिळाला नाही

घोडेगाव : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेने करूनही घोडेगाव प्रकल्पांतर्गत सुमारे १५६० आदिवासी मुलांना प्रवेशच मिळाला नाही. मर्यादित जागा व बाहरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ही मुले वंचित राहिली आहेत. अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घोडेगाव प्रकल्प कार्यालयांतर्गत २४ वसतिगृहे आहेत. यामध्ये ३८१० एवढी प्रवेशक्षमता असून, यावर्षी ५३७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश मागितला. पुणे शहरात कोरेगाव पार्क, हडपसर, मांजरी फार्म, पिंपरी चिंचवड, सोमवारपेठ, सांगवी येथे वसतिगृह आहेत. येथील वसतिगहात १८२५ विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो. यावर्षी २७७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश मागितला होता. सोलापूर जिल्ह्यातील वसतिगृह भरत नाहीत म्हणून येथील २०० जागा पुण्यातील वसतिगृहांमध्ये वाढवून घेतल्या. तरीही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही. पुणे ग्रामीणमध्ये घोडेगाव, मंचर, शिनोली, जुन्नर, ओतूर, राजगुरुनगर, वडगाव मावळ, डेहणे येथील वसतिगृहांमध्ये १७७० क्षमता आहे. येथे २४३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश मागितला होता. प्रवेश देताना जुन्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश द्यावा लागतो. नंतर नवीन विद्यार्थी घेतले जातात. मात्र, यात स्थानिक मुलांना प्रवेश मिळत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मुले प्रवेश मिळवतात. कारण स्थानिक विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, डी.एड., बी.एड. करण्याची व्यवस्था ग्रामीण भागात आहे. त्यामुळे हे शिक्षण घेणारे विद्यार्थी शहरात प्रवेश मागत नाहीत. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण घेणारेच विद्यार्थी प्रवेश मागतात. मात्र बाहेर जिल्ह्यातील सर्व प्रकारे विद्यार्थी पुण्यात प्रवेश मागतात. यात मेरिटनुसार प्रवेश देण्यात येत असल्याने स्थानिक विद्यार्थी वंचित राहतात. ५० टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे. राज्यात सगळीकडे शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. परंतु बीए, बीकॉम यांसारखे शिक्षण घेण्यासाठीसुद्धा विद्यार्थ्यांना पुण्यातच यायचे आहे.़याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी सांगितले, मंजूर संख्येपेक्षा जास्त जागा घेण्यास शासनाने नकार दिला आहे. मेरिटलिस्टनुसार आलेल्या सर्व मुलींना प्रवेश दिले आहेत. तरीही आम्ही अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकलेलो नाही. कारण पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व मुले शिकायला येऊ लागली आहेत. राज्यातील इतर प्रकल्पांच्या जागा रिकाम्या राहात आहेत. फक्त घोडेगाव प्रकल्पात विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. (वार्ताहर)