शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाखांच्या ऐवजाची पोलिसाच्या घरातून चोरी, जावई व मुलीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:12 IST

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ७ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ७ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, त्यांची मुलगी आणि जावयाने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी माधव देवकाते (वय ७८, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून संगीता सोनवणे आणि बबन सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते पत्नीसह चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड परिसरात राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. गेल्यावर्षी मुलगी नवºयासह फिर्यादीच्या घरात काही काळासाठी राहावयास आली होती. दरम्यान, फिर्यादीची पत्नी आजारी पडल्यामुळे त्यांना १ जून ते ३ जुलै २०१७ या कालावधीमध्ये उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. फिर्यार्दी हे पत्नीची देखभाल करण्यासाठी दवाखान्यात जात होते. त्यांच्या अनुपस्थितीत घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण ७ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला. काही महिन्यांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा ऐवज मुलगी आणि जावयाने चोरी केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. फिर्यादी हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनादोन मुले असून तेही पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची विवाहित मुलगी त्यांच्या घरी पतीसह राहावयास आली होती.