शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शेतकऱ्यांना मिळणार ११५ कोटी भरपाई

By admin | Updated: May 7, 2016 05:11 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांतील ११ गावांमधील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी आपल्या जमिनी दिलेल्या

घोडेगाव : पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांतील ११ गावांमधील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी आपल्या जमिनी दिलेल्या असून, त्यांना जमिनीची नुकसानभरपाई देण्यासाठी ११५ कोटी रुपये जमा झाले आहेत. भरपाईची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावेत; अन्यथा २० मेनंतर हे पैसे दिवाणी न्यायालय राजगुरुनगर येथे जमा होतील, अशी माहिती भूसंपादन अधिकारी संजय पाटील यांनी दिली. भांबुरवाडी, सांडभोरवाडी, जैदवाडी, पेठ, भोरवाडी क्र. १, भोरवाडी क्र. २, तांबडेमळा, भटकळवाडी, चाळकवाडी, नगदवाडी, कांदळी या ११ गावांचा यामध्ये समावेश आहे. येथून गेलेल्या महामार्गाच्या जमिनींच्या संपादनाच्या भरपाईची रक्कम शासनाकडून जमा झाली आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी बाधित खातेदारांनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. या पैशाची मागणी केली नाही, तर ही रक्कम दिवाणी न्यायालयात जमा होईल. शेवाळवाडी, मोरडेवाडी, निघोटवाडी, एकलहरे, कळंब, मंचर, आळेफाटा, वडगाव आनंद या गावांमधील जमिनींचे निवाडे मंजूर होऊन आले आहेत. त्याच्या नोटिसा आठवड्यात निघतील. यासाठीदेखील शासनाकडून १५८ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याचेही तत्काळ वाटप केले जाणार आहे. ही रक्कम पुढील २ महिन्यांत खातेदारांनी घेतली नाही, तर तेही पैसे दिवाणी न्यायालयात जमा होतील. (वार्ताहर)महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे : मोबदला देण्यासाठी प्रयत्नशीलमोजण्यांमध्ये झाडे, घरे, विहिरी यांची भरपाई मिळाली नाही, अशा काहींच्या तक्रारी होत्या. याबाबतचे सर्व अर्ज घेण्यात आले आहेत. स्थानिक महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून, मूल्यांकन करून त्याची नुकसानभरपाई मिळवी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्याचेही पैसे आल्याबरोबर वाटप केले जाईल. लोकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. नारायणगाव, वारुळवाडी यांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मंजूर होऊन आल्याबरोबर येथील खातेदारांना नोटिसा निघतील. त्याचबरोबर राजगुरुनगर, राक्षेवाडी, होलेवाडी, चांडोली या गावांची भूसंपादन सुनावणी व निवडा करण्याचे काम तत्काळ सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका वर्षात महामार्गाचे काम पूर्ण होणार जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-नाशिक महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. पुढील एका वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल. जमिनी देण्यास सुरुवातीच्या काळात लोकांनी तीव्र विरोध केला होता. नंतरच्या काळात लोकांसमवेत सतत बैठका घेऊन त्यांच्या शंकांचे निरसरन केल्यामुळे बहुतांश लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी अडचणी असल्या तरी चर्चा करून त्यातून मार्ग काढला जाईल. यापूर्वी पेठ, नगदवाडी, काचळवाडी व अन्य गावांतील लोकांनी पैसे स्वीकारलेले असून, येथे ४० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. - संजय पाटील, भूसंपादन अधिकारी