ग्रामपंचायातला ग्रामस्थांकडुन पाणीपट्टी, घरपट्टीच्या रूपाने महसूल जमा होतो. या रकमेवर गावचा खर्च तसेच विकासकामांना चालना मिळत असते. कर जमा करताना ग्रामपंचायतला विविध उपाययोजना कराव्या लागतात. बऱ्याचदा असे कर भरण्यास नागरिकांमध्ये उदासीनता असते. मात्र लंघेवाडी-चव्हाणवाडी ही छोटीशी ग्रामपंचायत याला अपवाद ठरत आहे. गेली दोन वर्षांपासून १०० टक्के करवसुली करत या ग्रामपंचायतने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. या वर्षी कोरोनासारखे जागतिक महामारीचे संकट आणि लॉकडाऊन असतानाही ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने तब्बल ३,३९,७५० रुपये एवढी रक्कम भरून १०० टक्के कर जमा केला आहे. या छोट्या ग्रामपंचायतचा आदर्श पॅटर्न संपूर्ण राज्यात दिशादर्शक ठरू शकते. या उपक्रमासाठी गावचे आदर्श संतोषराव लंघे, उपसरपंच स्वातीताई हराळे, ग्रामसेविका एस. व्ही.पोळ, ग्रामपंचायत सदस्य जयश्री लोखंडे, प्रभावती गरुड, शोभाताई मोहिते, वैभव जगदाळे, अक्षय बांदल, महेंद्र जासुद, कर्मचारी कर्मचारी, आजी-माजी पदाधिकारी, महिला बचत गट, युवक, युवती प्रयत्न करत आहेत.
लंघेवाडी ग्रामपंचायतीची १०० टक्के वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST