राजगुरुनगर : अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली रमेश चव्हाण याला १० वर्षे सक्तमजुरीची आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी ठोठावली.याबाबत सविस्तर हकीकत अशी, की पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत निमगाव (शिंदेमळा, ता. खेड) येथे राहात आहे. तिच्या आई-वडिलांनी २० मार्च २०१३ रोजी आपल्या घराची आवराआवर करण्याचे काम काढले होते. त्या दिवशी रात्री ८ वाजता मुलीने शौचास जायचे आहे, असे आईस सांगितले. कामात असल्याने शेजारी राहणाऱ्या रमेश नामदेव चव्हाण (वय २८, मूळ राहणारा दगडवाडी, ता. हातगाव, जि. नांदेड ) याला तिला सोबत करण्यास सांगितले. थोड्याच वेळात मुलगी रडत घरी आली. तिने आरोपीने तिला मारल्याचे सांगितले. तसेच घाणेरडे कृत्य केल्याचे सांगितले. आईने तपासल्यावर तिला घडला प्रकार लक्षात आला़ त्यांनी याबाबतची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात दिली. पोलीस उपनिरीक्षक आसिफराजा शेख आणि पोलीस नाईक यू. एस. गोरे यांनी या घटनेचा तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. (वार्ताहर)
बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: August 8, 2015 00:41 IST