शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळूउपसा करणारे १० ट्रक पकडले

By admin | Updated: March 26, 2017 01:34 IST

देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात महसूल विभागाची कारवाई करण्यात आली. या परिसरात अवैध वाळूवाहतूक

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात महसूल विभागाची कारवाई करण्यात आली. या परिसरात अवैध वाळूवाहतूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गेली दोन दिवस सचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार तहसीलदार विवेक साळुंखे यांनी महसूलचे पथक तयार करून या भागात अवैध वाळूवाहतूक करणारे दहा ट्रक पकडण्यात आले. या पथकामध्ये ५० ते ५५ कर्मचारी बरोबर घेण्यात आले होते. यामध्ये नायब तहसीलदार धनाजी पाटील, मंडलाधिकारी संजय स्वामी, मंडलाधिकारी प्रकाश भोंडवे, तलाठी बालाजी जाधव, तलाठी संतोष ईडुळे, तलाठी बारवकर, शरद लोंढे, हरिचंद्र फरांदे इत्यादी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.ही कारवाई करताना तहसीलदार विवेक साळुंखे यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. त्यामुळे ही मोहीम फत्ते करण्यामध्ये प्रशासनाला यश आले. एकाच ठिकाणी वाळूने भरलेल्या १० ट्रक पकडले. या ट्रकमधील सर्व ट्रकचालक पळून गेले; परंतु, तहसीलदारांनी बाहेरून ट्रक ड्रायव्हर बोलावून सर्व ट्रक केले आहेत. सर्व पकडलेल्या ट्रकवर दंडात्मक कारवाई व प्रतिबंधक म्हणून त्यांच्याकडून बॉण्ड करून घेणार असल्याने वाळूवाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई काल रात्रीपासून चालू होती. त्यामुळे महसूलातील सर्व कर्मचारी पकडलेल्या ट्रकजवळ रात्रभर बसून होते. परिसरातील अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांना याचा चांगलाच धसका बसला आहे.