शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरात १० टन केळीचे उत्पादन

By admin | Updated: July 25, 2016 02:09 IST

कोळमाथा येथील ३० वर्षीय युवकाने स्वत:चा व्यवसाय सांभाळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एक एकर क्षेत्रात ग्रँड नैन टिश्यूकल्चरवर १० टन केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आ

रामनाथ मेहेर,  ओतूरओतूरपासून जवळच असलेल्या कोळमाथा येथील ३० वर्षीय युवकाने स्वत:चा व्यवसाय सांभाळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एक एकर क्षेत्रात ग्रँड नैन टिश्यूकल्चरवर १० टन केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या केळीपासून आजचा बाजारभाव स्थिर राहिल्यास ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे जाणकार शेतकरी सांगत आहेत. या युवकाचे नाव नितीन भास्कर डुंबरे आहे. त्याने बायोटेक्नॉलॉजी व डी फार्मसी या पदविका प्राप्त केल्या आहेत. परंतु, स्वत:चा डी फार्मसीचा व्यवसाय सांभाळून शेतीसंबंधी आधुनिक माहिती तंत्रज्ञान मिळवून उत्तम प्रकारे शेतीतून विविध प्रकारचे उपक्रम राबवून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.गेल्या वर्षी १० जून २०१५ रोजी उती संवर्धित (टिशू कल्चर) ग्रँड नैन या जातीच्या केळीची लागवड केली. या प्रयोगाविषयी माहिती देताना नितीन भास्कर डुंबरे म्हणाले की, लागवडीसाठी ६ फुटांवर सरी पाडून ६़६ अंतरावर केळी रोपांची लागवड केली. रोपांसाठी बेड तयार केले. लागवडीपूर्वी एकरी प्रमाणात ४ ट्रॉली शेणखत टाकले, रोपांच्या मुळाशी बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांचे ड्रेचिंग करून लागवड केली, त्याच वेळी युरिया १ गोणे व सुपर फॉस्पेट २ गोणींचा डोसही दिला. रोपाची वाढ समाधानकारक झाली. त्यानंतर दर दोन महिन्यांनी युरिया व पोटॅश या खतांची मात्रा नियमित दिली. याच वेळी सह्याद्री बायोग्रीन सातारा यांच्या जैविक खतांचा वापरही एकरी प्रमाणात केला.यासाठी केळी उत्पादक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुविलास गाढवे, नितीनचे वडील भास्कर पोपट डुंबरे यांनी वेळोवेळी केळी बागेस भेट देऊन नितीन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.