शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी उत्पन्नात दहा टक्के वाढ

By admin | Updated: November 20, 2014 04:26 IST

औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने वाहन उद्योगांमध्ये तेजीचे वातावरण असल्यामुळे या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) उत्पन्नात सरासरी दहा टक्के वाढ झाली

पिंपरी : औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने वाहन उद्योगांमध्ये तेजीचे वातावरण असल्यामुळे या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) उत्पन्नात सरासरी दहा टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच टॉप टेन कंपन्यांच्या एलबीटी भरण्यात गतवर्षीच्या जकात उत्पन्नाच्या तुलनेत १६ कोटी ५४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. जकातीला पर्याय म्हणून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू झाला. बहुसंख्य व्यापाऱ्यांनी या कराच्या विरोधात असहकार पुकारल्याने एलबीटीचे अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झाले होते. औद्योगिक मंदी, बाजारपेठेत वाहन उत्पादनांच्या मागणीत झालेली घट यामुळे यामुळे एलबीटी महसुलाचे उद्दिष्ट गाठणे अवघड झाले होते. परंतु महापालिकेला उत्पन्न मिळवून देणारे औद्योगिक क्षेत्रातील टॉप टेन उद्योग-व्यवसाय यांच्याकडून एलबीटीचा अपेक्षित भरणा झाला. या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, एक्साईड, थरमॅक्स,सेन्च्युरी एन्का,एसकेएफ, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन आॅईल,सॅन्डविक एशिया,अल्फा लवाल, अ‍ॅटलास कॉप्को या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून गतवर्षी १५१ कोटी ३५ लाख ७५ हजार ७६० रूपये उत्पन्न मिळाले होते, ते या आर्थिक वर्षात १६७ कोटी ९० लाख ८ हजारांवर गेले आहे. २०१३-१४ आर्थिक वर्षात एलबीटीद्वारे ८५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. जकातीच्या तुलनेत एलबीटी उत्पन्नात तब्बल ३०६ कोटी रुपयांची घट झाली. २०१२ - १३ या आर्थिक वर्षात जकातीद्वारे १ हजार १५७ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. एलबीटी विभागाचे उत्पन्न कमालीचे घटत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कंपन्यांच्या भरणा रकमेत सरासरी १० टक्के वाढ झाली आहे. मंदीचा काळ जाऊन वाहन उद्योगाला तेजी आल्याने त्याचा अनुकूल परिणाम उद्योगधंद्यांवर जाणवला आहे.(प्रतिनिधी)