शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकप्रकरणी दहा जणांना कोठडी

By admin | Updated: April 24, 2017 05:06 IST

पूर्वीच्या भांडणांवरून तरुणाच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दहा जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता

पुणे : पूर्वीच्या भांडणांवरून तरुणाच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी दहा जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अभिजित तापकीर (वय २४), ऋषिकेश तापकीर (वय १९), शुभम बुर्डे (वय २१), ऋषिकेश ताम्हाणे (वय १९), राकेश तापकीर (वय १९), सत्यम तापकीर (वय १९), रविराज तापकीर (वय २२), ऋषिकेश रासकर ( वय १८), अक्षय रासकर (वय २१) आणि प्रमोद शिवरकर (वय २०, सर्व राहणार चऱ्होली) असे कोठडी देण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हिराबाई ताराचंद खेसे (वय ६५, रा. खेसेआळी, लोहगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आणखी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार लोहगावमधील खेसेआळी येथे २२ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. हिराबाई यांचा पुतण्या मयूर खेसे यांच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळे शिवराज आणि त्याच्या इतर साथीदारांनी मयूर खेसे याच्या घरावर हल्ला करून दगडफेक केली. घरावर दगडफेक करून घराच्या काचा फोडून पार्किंगमधील पाच वाहनांचे तसेच घराच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले. शिवराज आणि त्याच्या साथीदारांनी मयूर खेसे याच्या घरात घुसून घरातल्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन महिलांचा विनयभंग केला. हल्लेखोरांनी महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असे एकूण १ लाख ८३ हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारी वकील एस. जे. बागडे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.