शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडीत पिकवला १ किलोचा पेरू

By admin | Updated: January 30, 2017 02:41 IST

सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात कंपनी, गोडाऊन, रहदारी यांमुळे संपूर्ण परिसर व्यापलेला आहे. येथील तरुणही नोकरी-व्यवसायांच्या माध्यामातून पुढे जात आहे

सुनील भांडवलकर,कोरेगाव भीमासणसवाडी औद्योगिक क्षेत्रात कंपनी, गोडाऊन, रहदारी यांमुळे संपूर्ण परिसर व्यापलेला आहे. येथील तरुणही नोकरी-व्यवसायांच्या माध्यामातून पुढे जात आहे. शेती व्यवसायाकडे मात्र दुर्लक्ष केलेले पाहावयास मिळत असतानाच सणसवाडी येथील शेतकरी नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मच्छिंद्र हरगुडे यांनी आपल्या १८ एकर क्षेत्रात ‘रायपूर’ पेरूची आधुनिकरीत्या सेंद्रिय पद्धतीने लागवड करून बाग उभी केली आहे. १८ महिन्यांतच तब्बल १ किलोचा एक पेरू पिकविल्याने परिसरात या पेरूंना मोठी मागणी आहे.सणसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मच्छिंद्र हरगुडे या तिघांनी समाईक १८ एकर क्षेत्रावर पेरूची आधुनिक लागवड करण्याचा निर्णय घेऊन ‘रायपूर’ जातीच्या पेरूची लागवड केली. याच जातीची लागवड का करायची, यासाठी त्यांनी त्याचा संपूर्ण अभ्यासही केला. या १८ एकर क्षेत्रात तब्बल ८ हजार रोपांची लागवड त्यांनी एप्रिल २०१५मध्ये केली आहे. लागवडीनंतर या झाडाला १८ महिन्यांनंतर फळे येतात. सध्या त्यांची बाग १८ महिन्यांची पूर्ण झालेली असून, त्यांनी एक एकर क्षेत्रातीलच झाडांवर फळाचा बार धरलेला आहे. मात्र, उर्वरित १७ एकरांवरील बागेचा बार पुढील मे महिन्यासाठी घेतला जाणार आहे. या वर्षीचा एक एकरावरील बागेतील पेरूला सुमारे एक किलोपेक्षा मोठी फळे आलेली आहेत. रायपूर जातीचा हा पेरू इतर फळांपेक्षा अधिक टिकाऊ असून, शीत वातावरणात सुमारे एक महिना, तर उघड्या वातावरणात तीन महिने टिकतो. या फळामध्ये बियांचे प्रमाणीही खूपच कमी असून, खाण्यासही खूपच चवदार आहे. तसेच, साखररहित असल्याने तो डायबेटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे. हा पेरू देशात कोणत्याही बाजारपेठेत विकला जातो. परदेशातही त्याला मोठी मागणी आहे. या फळाला किलोला ७० ते ८० रुपये बाजाराभाव असून, एकरी उत्पादन सुमारे अडीच लाखांपर्यंत आहे.