शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जनहित याचिका मागे घेण्यासाठी १ कोटीची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भ्रष्टाचारविरोधी गांधीगिरी जन आंदोलनाचा सदस्य असल्याचे सांगून जनहित याचिका दाखल करून बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भ्रष्टाचारविरोधी गांधीगिरी जन आंदोलनाचा सदस्य असल्याचे सांगून जनहित याचिका दाखल करून बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागणारी टोळी समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका दाखल करून ती मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव (रा. अंकुर कमला नेहरू पार्कसमोर, डेक्कन जिमखाना), के. ए. कुरेशी (रा. मलकाजी वाडा, खडकी बाजार), अशोक शंकरराव जाधव (रा. राजा बंगलो, खराडी) आणि बापू गोरख शिंदे (रा. नऱ्र्हेगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एप्रिल २०१५ ते २४ जुलै २०१९ दरम्यान शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३च्या समोर रोडवर घडला आहे.

याप्रकरणी निखिल केतन गोखले (वय ४७, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. गोखले यांची शशिबिंदू कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे बोपोडी येथील बांधकामाची परवानगी चुकीची आहे, याबाबत राजेश बजाज व इतरांनी मुंबई हायकोर्टात दिवाणी अर्ज केला होता. त्या वेळी तिघांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात तिघांनी २० ते ३० ऑगस्टपर्यंत राजेश बजाज यांना डेंग्यू झाला व त्यांना बेड रेस्ट घेण्यास डॉक्टरांनी सांगितले. तसेच के. ए.. कुरेशी यांना व्हायरल संक्रमण झाले असल्याने सुनावणीच्या वेळी हजर राहू शकले नसल्याचे नमूद केले. त्या तिघांनी सादर केलेले मेडिकल प्रमाणपत्र हे बनावट करून दाखल केल्यामुळे कंपनीची व कोर्टाची फसवणूक केली आहे. तसेच हायकोर्टात जनहित याचिकेची फेरसुनावणी करण्याकरिता केलेल अर्ज मागे घेणेकरिता ऑगस्ट २०१८ मध्ये शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३ च्या समोर रोडवर त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी करून, शिवीगाळ करून कंपनीसह फिर्यादी व फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर यांना संपवेन अशी धमकी दिली होती.

या चौघांनी आम्हाला जिवे मारण्याची व कंपनीच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्याची धमकी देऊन आमच्या विरोधात विनाकारण न्यायालयात अर्ज करीत होते. त्या भीतीपोटी आम्ही तक्रार दिलेली नव्हती. परंतु, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याबाबत वर्तमान पत्रामधून समजल्याने आम्ही त्याने दिलेल्या त्रासाबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो असल्याचे गोखले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. गोखले यांच्या फिर्यादीनुसार राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

* दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रवींद्र नौपतलाल सांकला यांना ५० लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

* राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.

* बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने राजेश बजाज याला यापूर्वी अटक केली होती.