शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिथे घेतली रॅली, ती जागा तृणमूलने गंगाजल शिंपडून शुद्ध केली

By बाळकृष्ण परब | Updated: February 23, 2021 17:32 IST

Narendra Modi News : पंतप्रधान मोदींची सभा ज्या मैदानावर झाली ते मैदान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी गंगाजल शिंपडून शुद्ध केले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Assembly Election 2021 ) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress ) आणि भाजपामधील (BJP) संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. दरम्यान, बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काल हुगळीमध्ये सभा घेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. दरम्यान, आता पंतप्रधान मोदींची सभा ज्या मैदानावर झाली ते मैदान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी गंगाजल शिंपडून शुद्ध केले आहे. ( place where Prime Minister Narendra Modi held a rally was cleansed by Trinamool Congress by sprinkling Ganga water)हुगळीमध्ये तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या पुढाकारामध्ये हे अभियान चालवले गेले. तृणमूलचा आरोप आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील सभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर चुकीचे आरोप लावले. तसेच यादव यांनी केंद्र सरकारकडून बंगालसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोपही केला.दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा २४ फेब्रुवारी रोजी याच मैदानावर निवडणुकीच्या सभेला संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत गंगाजल शिंपडून मैदानाचे शुद्धिकरण करून आपण योग्य केले आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी येथे जो हॅलिपॅड बांधण्यात आला. त्यासाठी अनेक झाडे तोडण्यात आली, असा आरोप तृणमूलने केला आहे. येथे तीन हॅलीपॅड बांधण्यात आले, त्यासाठी एक शंभर वर्षे जुना वृक्षही तोडण्यात आला, असा दावा तृणमूलने केला आहे.यादरम्यान आता तृणमूल काँग्रेसने हॅलीपॅड असलेल्या जागेवर वृक्षारोपनाचे अभियान सुरू केले आहे. तृणमूलने सांगितले की, भाजपाकडून पर्यावरणाचे नुकसान करण्यात आले, त्याची भरपाई तृणमूलकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस