शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार : न झालेले पंतप्रधान..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 19:56 IST

Sharad Pawar Birthday : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे शरद पवार बाभूळ झाडासारखे घट्टपणे उभे आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले शरद पवार यांनी प्रसंगी  दिल्ली श्रेष्ठींशी संघर्षही केला. यासंदर्भात ते यशवंतरावांच्या दोन पाऊल पुढे आहेत.

- मधु भावे(ज्येष्ठ पत्रकार ) महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे शरद पवार बाभूळ झाडासारखे घट्टपणे उभे आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले शरद पवार यांनी प्रसंगी  दिल्ली श्रेष्ठींशी संघर्षही केला. यासंदर्भात ते यशवंतरावांच्या दोन पाऊल पुढे आहेत. ते ८१व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. जीवनात त्यांना अपयश माहीत नाही. १९६७ सालापासून २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देशभरात अव्वल मतांनीच ते निवडून येत आहेत. १९८४च्या लोकसभा पोटनिवडणुकीत (इंदिराजींच्या हत्येनंतर जी निवडणूक झाली) राजीव गांधींच्या खालोखाल क्रमांक दोनची (५लाख ४ हजार ) मतांच्या फरकाने विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले. बारामती असो किंवा माढा असो, त्यांना अपयश माहीत नाही. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर मतदारसंघात जाणारे आणि तीन-चार लाख मतांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून येणारे ते एकमेव नेते आहेत. मतदारसंघ न बदलता सलग चाळीस वर्षे त्यांनी बारामती जिंकली. देशात त्यांच्या तोडीचा मोठा नेता नाही. ते पंतप्रधान झाले नसले तरी ते होणार नाहीत असे सांगता येणार नाही. कदाचित २०२४ साल त्यांच्याच नावावर असेल. पण आज ‘पंतप्रधान नसलेला पंतप्रधान’ असा त्यांचा उल्लेख करावा लागेल. २२व्या वर्षी युवक काँग्रेसचे अध्यक्ष २७व्या वर्षी आमदार, ३२व्या वर्षी मंत्री, ३८व्या वर्षी मुख्यमंत्री, ४०व्या वर्षी विरोधी पक्षनेता, ५१व्या वर्षी संरक्षणमंत्री.  रयत शिक्षण संस्था, मुंबई क्रिकेट असोसिएशन, जागतिक क्रिकेट असोसिएशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू विज्ञान केंद्र, नाट्य परिषद अशा अनेक संस्थांना त्यांनी मोठे केले. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही.पी. सिंग आणि मोदी पंतप्रधान होतात. मग नेतृत्वाचे अनेक गुणविशेष पवार यांच्याकडे असताना, ते का होऊ शकणार नाहीत? आकड्यांचा खेळ जमत नाहीत, म्हणून त्यांचे पंतप्रधानपद हुकणे म्हणजे सुयोग्य नेतृत्वाला लोकशाहीने संधी नाकारणे असे होता कामा नये.पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. २०१४ ते २०१९ पर्यंत पुरोगामी महाराष्ट्रावर असलेले भाजप सरकार दूर करण्यासाठी पवारांचे राजकीय नैपुण्य पणाला लागले. लोकसभा निवडणुकीत पावसात भिजलेल्या सह्याद्रीलाही ओलेचिंब होऊन जनतेने स्वीकारले. राज्यात पुरोगामी सरकार आणणे हेच पवार यांच्यासमोर आव्हान होते. काँग्रेस व राष्टवादीची आघाडी होतीच. त्या निवडणुकीनंतर शिवसेनेसारख्या आक्रमक राजकीय नेतृत्वाला सोबत घेऊन नवा इतिहास पवार यांनी घडवला.       २०२४च्या निवडणुकीत मराठी सेनापतीला पंतप्रधानपदाची संधी मिळणे हे लक्ष्य घेऊन पुढची ४ वर्षे काम केले तर हे स्वप्नरंजन उद्याचे वास्तव ठरेल. मतदार उबलेल्या मानसिक अवस्थेतून बाहेर येईल आणि मराठी नेत्याचे एक पाऊल पुढे पडून आज ‘पंतप्रधान नसलेले पंतप्रधान’ देशाचे उद्याचे नेते होतील, या कोटी कोटी शुभेच्छा त्यांना देऊ या. शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक २०१९ साली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तळपत्या उन्हात संपली. निवडणूक संपली त्या दिवशी रात्री काही राजकीय नेते कोणी जीनिव्हाला गेले, पॅरिसला गेले, तर कोणी सिंगापूरला. शरद पवार मात्र लोकसभा निवडणूक संपल्याच्या दुसऱ्या दिवशी ४७ अंश कडक तापमान असलेल्या सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बांधावर उभे राहून, त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हात टाकून भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत तो करत असलेले कष्ट पाहून अशा शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याची चर्चा करत होते. ...अन्य नेते आणि शरद पवार यांच्यातील फरक पावसात भिजलेल्या सह्याद्रीने जसा दाखवून दिला, तसाच तळपत्या उन्हात शेतकऱ्याच्या बांधावर उभ्या राहणाऱ्या नेत्यानेही दाखवून दिला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण