शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेसाध्यक्ष, पक्षाची जबाबदारी सांभाळण्यास तयार - सूत्रांची माहिती

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 5, 2021 14:47 IST

राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती.

ठळक मुद्दे राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे जवळपास 5 तासहून अधिक वेळ ही बैठक चालली. राहुल गांधी यांनी, 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा

नवी दिल्ली -काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असतानाच आता पुन्हा एकदा काँग्रेसाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत. यासंदर्भात शनिवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या वेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते.5 तासहून अधिक वेळ चालली बौठक - सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे जवळपास 5 तासहून अधिक वेळ ही बैठक चालली. यावेळी उपस्थित सर्व नेते मंडळींनी आपापले विचार व्यक्त केले. तसेच या बैठकीत, राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणीही करण्यात आली. यानंतर अखेर, पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. 

या खासदारांनी केली मागणी -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत के. सुरेश, अब्दुल खालिक, गौरव गोगोई आणि काही इतर खासदारांनी, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची धुरा साभाळावी, असा आग्रह केला होता. या खासदारांशीवाय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, दिग्विजय सिंह देखील म्हणाले, की आता राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व करायला हवे. नुकतेच, काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अशीच मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचे अनेक नेत्यांनी समर्थनही केले होते.

'सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा' -राहुल गांधी यांनी 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर, या पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहूल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहिले होते, 'काँग्रेस अध्यक्ष म्हणून 2019मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत मिळालेल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. आपल्या पक्षाच्या भविष्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक आहे. यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.' 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीdelhiदिल्ली