शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 18:19 IST

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिला हात

कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी झिडकारला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हणत खोत यांनी दिलजमाईचे संकेत दिले होते. मात्र खोत यांचे परतीचे दोर कापण्यात आल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. ज्यांना संघटनेनं समिती नेमून हाकलून दिलं, त्यांचा परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले.जिल्हाच्या राजकारणात भाजपकडून डावललं जात असल्यानं सध्या सदाभाऊ खोत नाराज असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी राजू शेट्टींना हात देण्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राजू शेट्टींनी खोतांना पुन्हा सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला. संघटनेत काम करण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत. स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य. या दोन्ही गोष्टी खोत यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांना संघटनेत पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं शेट्टींनी म्हटलं.राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?आपल्या आणि राजू शेट्टींच्या मागण्या एकच असून शेतकऱ्यांचं हित हेच प्राधान्य असल्याचं खोत म्हणाले होते. मात्र खोत यांच्या विधानांचा शेट्टींनी समाचार घेतला. 'शेतकऱ्यांबद्दल अनेक जण पुतना मावशीचं प्रेम दाखवतात. पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर त्यांनी कडकनाथमध्ये अडकलेले शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत. कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, म्हणून ते आता असं बोलत असावेत. मात्र त्यांच्या मायावी बोलण्याला आम्ही फसणार नाही,' अशी टीका राजू शेट्टींनी केली.काय म्हणाले सदाभाऊ खोत?शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी