शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 16:53 IST

Mamata Banerjee: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Mamata Banerjee: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देशात खेला होबे होणार आणि २०२४ सालची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. 

विरोधी पक्षाचं कमान तुम्ही सांभाळणार का? असा विचारण्यात आलं असता "मी काही राजकीय ज्योतिषी नाही. हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आज मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक आहे. संसदेच्या सत्रानंतर विरोधी पक्षांची बैठक व्हायला हवी", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. (Mamata banerjee targets pm narendra modi said 2024 general election will be modi vs country)

विरोधी पक्षाचं गणित हे राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. जर कुणी याचं नेतृत्व करणार असेल तर मला काहीच हरकत नाही. मी कुणावरही माझं म्हणणं लादू इच्छित नाही. सध्या अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबत संसदीय अधिवेशनानंतर प्रमुख पक्षांसोबत बैठक घेऊन चर्चा करू, असं ममता म्हणाल्या.

पुढील ६ महिन्यांत परिणाम दिसतील"सोनिया आणि केजरीवाल यांच्याशी भेट होणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वजण एकत्र येऊ इच्छित आहेत. सोनिया गांधी देखील विरोधी पक्षांनी एकत्र यावं या भावनेच्या आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल. विरोधी पक्ष म्हणून सर्वजण एकत्रितरित्या गांभीर्यानं काम करू लागलो तर येत्या ६ महिन्यांत याचे परिणाम दिसू शकतात", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

देशातील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जर येत्या काळात राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. खेला होबेचा नाद आता संपूर्ण देशात घुमणार आहे. आतापर्यंत अच्छे दिनची वाट खूप पाहिली आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी